---
मास्क ठरत आहे फॅशन
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी असला तरी संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे मास्क लावल्याशिवाय बाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनातर्फे केल्या जात आहे. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थिती नसून मास्क लावत आहे. मात्र हनुवटीवर ठेवून प्रशासकीय कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये मात्र नुकसान नागरिकांचेच आहे. त्यामुळे हनुवटीवर मास्क न ठेवता तोंड आणि नाक व्यवस्थित झाकेल असा लावणे गरजेचे आहे.
संसर्ग टाळण्यासाठी अनावश्यक कामासाठी घराबाहेर पळू नये, मास्कचा वापर करावा, मास्क न घातल्यास दंड वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे दंड वाचविण्यासाठी अनेकजण मास्कचा वापर करीत आहेत. मात्र केवळ हनुवटीवरच मास्क ठेवत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचे योग्य पद्धतीने वापरावा, असे आवाहन केले जात आहे.
------
मोकाट जनावरांमुळे पिकांची नासाडी
बल्लारपूर : तालुक्यातील काही शिवारात कापसाची तसेच रब्बीमध्ये गहु, हरभरा पिकांची लागडव करण्यात आली आहे. दरम्यान, बोंडअळीमुळे शेतकरी त्रस्त आहे. असे असतानाही आता मोकाट जनावरे तसेच वन्यप्राणी पिकांचे मोठे नुकसान करीत आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
कमी दाबामुळे वीज ग्राहकांना त्रास
जिवती : तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये विजेचा लंपडाव सुरू आहे. दिवसभर विजेचा कमी- अधिक दाब असतो. काही वेळा एका फेजची वीज राहत नाही. यामुळे ग्राहकांत रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.