चंद्रपूर : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) माध्यमातून प्रवेश परीक्षा देत मुलींनाही आता सैन्यदलात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात नुकताच निर्णय दिला आहे. यामुळे लाडाची लेक सीमेवर लढण्यासाठी सज्ज झाली आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षेत पात्र मुलींना बसण्याची परवानी देण्याबाबत न्यायालयात याचिता दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने नुकताच निर्णय दिला आहे. सैन्यदलात कॅरिअर करण्याचे मुलींचेही स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे. शाळा, महाविद्यालय स्तरावर चालविलेल्या जाणाऱ्या एनसीसीच्या माध्यमातून सैन्यदलाची आवड निर्माण केली जाते. मात्र यापूर्वी काही मोजक्याच ठिकाणी मुलींना परवानगी होती. आता मात्र एनडीएची परीक्षा देऊन स्वप्न साकार करता येणार आहे.
कोट
आता मुलीसुद्धा एनडीएसाठी पात्र आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी सुद्धा एनसीसीच्या माध्यमातून मूली समोर जाणार असून ही अभिमानाची बाब आहे.
-मोरेश्वर बारसागडे
एनसीसी ऑफीसर
ज्युबिली हायस्कूल, चंद्रपूर
कोट
एनसीसीमध्ये ए ग्रेड आणि पदवीमध्ये ५० टक्के गुण मिळाल्यानंतर सैन्यदलात मुलांना स्पेशल एन्ट्री मिळत होती. आता मुलींनाही ती मिळणार आहे. त्यामुळे मुली सुद्धा लष्करामध्ये अधिकारी बनणार आहे. ही आनंदाची बाब आहे.
-कॅप्टन डाॅ. सतीश कन्नाके
असोसिएट एनसीसी ऑफीसर
बाॅक्स
चंद्रपूरात एनसीसीच्या ३०० मूली
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये एनसीसीमध्ये ३०० च्या वर मुली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. मात्र आता एनडीएमध्येही मुलींना स्थान देण्यात येणार असल्याने एनसीसीमध्येही मुलींची संख्या वाढतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बाॅक्स
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएची प्रवेश परीक्षा आता मुलीनाही देता येणार आहे. केवळ त्या महिला असल्यामुळे त्यांना या परिक्षेपासून किंवा लष्करात भरती होण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयान दिला आहे.
याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे लष्कराचे दरवाजे आता मुलींसाठीही खुले झाले आहे.
बाॅक्स
लष्करात प्रवेशासाठी....
लष्करात प्रवेशासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएची परीक्षा देणे आवश्यक असते. या परिक्षेद्वारे एऩडीएमध्ये निवड झाल्यानंतर अधिकारी होता येते. त्यामुळे ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची समजल्या जाते.
बाॅक्स
लेकींनी मानले न्यायालयाचे आभार
न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुलींना सैन्यात जाण्यासाठी अधिक वाव मिळणार आहे. एनसीसीमधील प्राथमिक सैनिकी धडे मिळालेले असतात. यापूर्वी एनसीसीमधील केवळ एसएसबीच्या माध्यमातून जाता येत होते. एनडीएच्या माध्यमातून प्रवेश परीक्षा देण्यास मुभा मिळणे म्हणजे सैन्य दलात जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुलींच्या पंखांना बळ मिळाले आहे.
-नाजूका कुसराम
कोट
न्यायालयाने मुलींसाठी एनडीएची परीक्षा देण्यास मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. तो अतीशय स्वागतार्य आहे. ज्यांनी शाळेतच एनसीसीचे प्रशिक्षण घेतले आहे. त्या मुलांची भारतीय संरक्षण दलात सेना अधिकारी म्हणून भरती होण्याची महत्त्वाकांक्षा असते. आता एनडीए ही एक सुवर्णसंधी नक्कीच ठरेल. या निर्णयाने मुलीही सर्व क्षेत्रात मुलांएवढीच क्षमता बाळू शकतात. हे सिद्ध होणार आहे.
-सपना मानकर, चंद्रपूर
कोट
एनडीएची स्वत:ची प्रवेश परीक्षा होते. आतापर्यंत एनडीए हे पुरुषांसाठी मर्यादित होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार मुलीनांही आता एनडीएत प्रवेश खुला झाला आहे. यामुळे सैन्यात महिलांना असलेल्या संधीमध्ये भर पडली आहे. त्यामुळे देशसेवेत रुजू होण्यासाठी महिला तयार होणार आहे. एनडीएच्या प्रवेशामुळे सैन्यात महिलांची संख्या वाढून अधिकाधिक मुलींना प्रोत्साहन मिळेल.
-धम्मज्योती रायपुरे