लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील चार महिन्यांपासून बंद असलेली एसटी महामंडळांची आंतरजिल्हा वाहतूक आजपासून सुरु होत आहे. विशेष म्हणजे, बसच्या प्रवासासाठी कुठल्याही पासची गरज नसल्याने आता प्रवाशांना विना अडथळा प्रवास करणे सोईचे होणार आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.‘प्रवाशाच्या सेवे’साठी हे ब्रिद घेवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांची बस धावते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने २४ मार्चपासून बससेवा बंद होती. बससेवा बंद झाल्यामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याने मंडळाने बसमधून मालवाहतूक सुरु केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ५० टक्के प्रवासी घेऊन जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरु करण्यात आली. मात्र आंतरजिल्हा बसफेरी बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटना तसेच प्रवाशांकडून बसफेऱ्या सुरु करण्याची मागणी होत होती. त्यामुळे शासनाने आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे.शासनाच्या परवानगीनुसार २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने आंतरजिल्ह्यासाठी बस सुरु करण्यात येणार आहेत.-आर. एन. पाटील,विभागीय नियंत्रक, चंद्रपूर आगार
चंद्रपुरातून इतर जिल्ह्यात धावणार लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 5:00 AM
‘प्रवाशाच्या सेवे’साठी हे ब्रिद घेवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांची बस धावते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने २४ मार्चपासून बससेवा बंद होती. बससेवा बंद झाल्यामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याने मंडळाने बसमधून मालवाहतूक सुरु केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ५० टक्के प्रवासी घेऊन जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरु करण्यात आली.
ठळक मुद्देपासची गरज नाही : लॉकडाऊनमध्ये प्रवाशांना मोठा दिलासा