ब्रम्हपुरी : महाराष्ट्र शासनाच्या एस टी. बसचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. तर अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, याच लालपरीचा आगारातून होणारा प्रवास चिखल भरल्या खड्डयातून होत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे बसस्थानकातील रस्त्यांची दुरुस्ती केव्हा होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. ब्रम्हपुरी बसस्थानकातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, आगारातून एस.टी.चे आवागमन करताना रस्त्यात असलेल्या खड्डे व चिखलयुक्त पाण्यातून प्रवास करावा लागतो. हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या स्थानकातून दररोज शेकडो प्रवासी, शालेय विद्यार्थी प्रवास करतात. स्थानकातून आवागमन करण्याकरिता असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी त्यात साचते. अनेक वर्षांपासून या रस्त्यांची साधी डागडुजी करण्यात आलेली नाही, तर प्रवाशांकरिता स्वच्छतागृह तसेच उपाहारगृह नसल्याने दूरवरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
290721\img_20210729_070409.jpg
खड्डेयुक्त रस्ता