जेनेरिक औषधसाठा वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : पंतप्रधान जनआरोग्य औषधी केंद्रामध्ये शासनाच्या सवलतीत औषधसाठा वितरित करण्यात येतो. मात्र, काही केंद्रात अत्यल्प प्रकारचा औषधसाठा उपलब्ध आहे. परिणामी, अतिरिक्त पैसे देऊन रुग्णांना औषधांची खरेदी करावी लागत आहे. औषधसाठा वाढविण्याची मागणी आहे. खासगी दुकानात महागड्या औषधसाठा खरेदी करावा लागतो. त्यामुळे साठा वाढवावा, अशी मागणी आहे.
रामसेतूकडे पोलीस गस्त वाढवावी
चंद्रपूर : येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रामसेतू पुलाकडे सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते. युवक-युवतींचा मोठा गराडा असतो. अनेकजण सेल्फी काढण्यासाठी गर्दी करीत असतात. परंतु, येथून मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असल्याने अपघाताची संख्या नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
बसस्थानकाच्या कामाला गती द्यावी
चंद्रपूर : येथील बसस्थानकाचे काम मागील अनेक दिवसांपासून कासव गतीने सुरु आहे. त्यामुळे बस ठेवण्यासाठी बसचालकांना मोठी अडचण जात आहे. याचा फटका प्रवाशांनासुद्धा बसत आहे. कोरोनानंतर आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी बघायला मिळते. परंतु, बसस्थानकाचे काम संथगतीने सुरु असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे.
महागाई कमी करण्याची मागणी
चंद्रपूर : मागील काही महिन्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूचे दर गगणाला भिडले आहे. पूर्वीच कोरोनामुळे जनसामान्याचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच सततच्या दरवाढीने आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कर्ज वितरण मोहीम राबवावी
चंद्रपूर : कोरोनाने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच नोकरभरती बंद आहे. परिणामी अनेकजण बेरोजगार आहे. त्यामुळे शासनाने बेरोजगारांसाठी कर्ज वितरण मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. शासनाकडून बेरोजगारांसाठ अनेक मोहीम राबविण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात त्याची अमंलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने त्याचा फायदा मिळत नाही.