सुधीरकुमार कोचर यांचे प्रतिपादन : चंद्रपूर जैन मंदिर शताधिक महोत्सवाचा समारोपचंद्रपूर : वर्तमान युवकांना महावीर स्वामी यांच्या सिद्धांताची चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. केवळ आजची भाषा बदलली असून सिद्धांत हे जुणेच आहेत, असे प्रतिपादन आयपीएस अधिकारी सुधीरकुमार कोचर यांनी केले.चंद्रपूर येथील श्री शांतीनाथ जिनालय जैन श्वेतांबर मंदिराच्या शताधिक महोत्सवानिमित्त्य आयोजित विचक्षण व्याख्यानमालेत अंतिम सत्रात ‘वॉट्सअॅप पिढीला महावीर स्वामी यांचे निमंत्रण’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचा प्रारंभ साध्वीजी श्री हेमप्रज्ञाश्रीजी महाराज यांच्या प्रवचनाने झाला. त्यांनी विचक्षण महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सुधीर कोचर पुढे म्हणाले, महावीर स्वामी तथा भारतीय संस्कृतीचा सिद्धांत आणि वर्तमान स्थितीत वॉट्सअॅपवर येणारे रोचक संदेश यांचा मिलाप करताना समानता प्रस्तुत केली. ते म्हणाले, तुम्हचे आसू पुसणारे अनेक जण मिळतील मात्र नाक पुसणारे मिळणार नाही. त्यामुळे महावीर स्वामी यांनी म्हटले आहे, जीवनात केलेल्या पापाचे पश्चाताप स्वत:लाच करायचे आहे. पाच दिवसीय शताधिक महोत्सवाच्या समारोपाला जैन मंदिरात दादागुरूदेवचे पूजन संदीप कोठारी परिवाराकडून करण्यात आले. सायंकाळी राजकुमार पाल यांच्याद्वारे प्रभू आरती नरेंद्र श्रेयांस बैद परिवार द्वारे करण्यात आली. यशस्वीतेसाठी सकल जैन समाज, श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, स्थानकवासी श्री संघ, दिंगबर चंद्रप्रभू मंदिर तुकूम, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, जैन सेवा समिती, आनंद नागरी सहकारी बँकेचे सहकार्य मिळाले. महोत्सव दरम्यान पाच दिवसीय महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चंद्रपूर शहरातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)
भाषा बदलली, सिद्धांत मात्र जुनेच
By admin | Published: November 24, 2015 1:06 AM