लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याचे अर्थ,नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या संकल्पातंर्गत २०१९ पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते आनंदवन येथे उत्साहात पार पडला. मोहिमेच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यात १७ लाख ५ हजार ८९८ तर संपूर्ण राज्यात २ कोटी ३२ लाख ८९ हजार ६१ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.‘५० कोटी वृक्षलागवड’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेला यशस्वी करण्यासाठी राज्यात ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम सुरू झाली आहे. जिल्ह्यात १ जुलैला पहिल्याच दिवशी २ लाख ११ हजार ८०२ झाडे, दुसऱ्या दिवशी २ जुलै रोजी २ लाख ३९ हजार १९६ झाडे लावण्यात आली. ३ जुलैला २ लाख ८१ हजार ८४४ तर ४ जुलैला ३ लाख ६० हजार ४७० झाडे लावण्यात आली.या मोहिमेच्या पाचव्या दिवशी ६ लाख १२ हजार ५८६ झाडे लावण्यात आली आहे. मानवाने निसर्गाकडून फक्त घेण्याचेच काम केले आहे. आता वेळ आहे निसर्गाला परतफेड करण्याची. त्यामुळे शासनाच्या विविध विभागांसोबतच सर्वसामान्य नागरिक, विविध संस्था व संघटनांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग व्हावे, असे आवाहन चंद्रपूर वनवृत्त व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.घुग्घुस शहरात दीड हजार वृक्ष लागवडघुग्घुस : शहरात दीड हजार वृक्ष लागवड करण्यात आले. पहिल्या दिवशी वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, घुग्गुसचे सरपंच, वेकोलिचे उपमहाप्रबंधक व ठाणेदार उपस्थित होते. शहरातील नागरिकांनी वृक्षदिंडी व स्वच्छता रॅलीचे जल्लोषात स्वागत केले. श्री गुरूदेव सेवा मंडळ, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून वृक्षारोपणाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. वृक्षदिंडीच्या दुसºया दिवशी चंद्रपूर तालुक्यातील घग्गुस, मोरवा या गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. भद्रावती तालुक्यातील मासळ व माजरी येथे दिंडी पोहोचताच गावकऱ्यांनी स्वागत केले.
पाच दिवसात विविध विभागांकडून १८ लाख वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:02 AM
तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याचे अर्थ,नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या संकल्पातंर्गत २०१९ पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते आनंदवन येथे उत्साहात पार पडला.
ठळक मुद्देमोहीम सुरूच। ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत संस्था, संघटनांचाही सहभाग