शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

गोंडी भाषा मानकीकरण कार्यशाळेचे काम अंतिम टप्प्यात

By admin | Published: November 25, 2015 3:40 AM

स्थानिक राजीव गांधी कामगार भवनात सुरू असलेल्या गोंडी भाषा मानकीकरण कार्यशाळेचे काम अंतिम टप्प्यात आले

चंद्रपूर : स्थानिक राजीव गांधी कामगार भवनात सुरू असलेल्या गोंडी भाषा मानकीकरण कार्यशाळेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आजपर्यंत जवळपास तीन हजार शब्दापेक्षा जास्त शब्दाचे मानकीकरण पूर्ण झाले आहे. कार्यशाळेला देशातील विविध राज्यातून आलेल्या गोंडियन समाजातील साहित्यिक, अभ्यासक, विचारवंत व संशोधक याचा माध्यमातून काम सुरू आहे.गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवती, गोंडराजे समाज सुधारक ट्रक चंद्रपूर, सेंट्रल गोंडवाना नेट आदिवासी स्वरा भोपाल या संस्थेमार्फत २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत गोंडी भाषा मानकीकरण सहावी राष्ट्रीय कार्यशाळा चंद्रपुरात सुरू आहे. कार्यशाळेचा समारोप व खुले चर्चासत्र २५ नोव्हेंबरला दुपारी ११.३० वाजता होणार असून यावेळी गोंडियन समाजातील मान्यवर व विचारवंत उपस्थित राहून गोंडीयन समाज बांधवाना गोंडी भाषा मानाकीकरणाचे महत्त्व व पुढील वाटचालीबाबत मार्गदशन करणार आहेत. कार्यशाळेला उपस्थित कन्नड विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉ.के.एम. मैत्रेय, गोंडी साहित्यीक प्रकाश सलामे, नागोराव मरसराम, सिडाम आरजू यांच्यासह मध्यप्रदेश राज्याचे साहित्यीक गुलजार सिंह मरकाम, सुशिला धुर्वे, छत्तीसगडचे देविलाल नरोटे, नेमीलाल कुमरा, ओरीसाचे क्रिष्णा बुरडा, आनंद मडावी, तेलंगाणाचे मधूकर सिडाम, भीमराव कोटनाके, आंध्रप्रदेशचे रावण सिडाम, नंदलाल धुर्वे, महाराष्ट्राचे उषाकिरण आत्राम, मनिरावण दुगा, गोदरु पा. जुमनाके यांच्या नेतृत्त्वात चमू काम करीत आहेत. गोंडीभाषा मानकीकरण कार्यशाळेच्या माध्यमातून गोंडी भाषेचा शब्दकोष तयार करण्यात येणार आहे. लोप पावत चाललेल्या व विविध स्थानिक भाषेत संकरीत होत असलेल्या गोंडी भाषेचे जतन व संवर्धन या माध्यमातून होणार असून गोंडी भाषेला मान्यता मिळण्याच्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. कार्यशाळेला समाजबांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन धिरज शेडमाके यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)