विनायक येसेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : तालुक्यातील चारगाव येथे अडीच वर्षांपूर्वी वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे येथील विजय धानकी यांचे घर कोसळले. त्यात त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा मातीच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाला. यावेळी धानकी कुटुंबाचे छत्र हरपले. त्यामुळे ते गेल्या अडीच वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात वास्तव्यास आहेत. मात्र प्रशासनाने अजूनही त्यांना घरकूल दिले नाही.भद्रावती तालुक्यातील चारगाव गावसभोवताल वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. या परिसरातील तेलवासा, ढोरवासा या खाणीमध्ये नेहमीच ब्लास्टिंग होत असते. घटनेच्या दिवशीसुद्धा वेकोलिकडून ब्लास्टिंग करण्यात आली. त्या दिवशी मुलीचे वडील व लहान भाऊ हे बाहेरगावी गेले होते. आईही बाहेर होती. तर मृत मुलगी मेघा धानकी ही आतील खोलीत झोपून होती. वेकोलिची ब्लास्टिंग होताच शेजारी असलेले प्रभाकर वासाडे यांच्या घराची भिंत धानकी यांच्या घरावर पडल्यामुळे त्याचे घर कोसळले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती संपूर्ण जिल्ह्यात पसरली. घटनास्थळी, तहसीलदार, पोलीस, वेकोलि अधिकारी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वेकोलि अधिकाºयांनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने येथील गावकºयांनी शांतपणे मार्ग मोकळा केला.त्याचप्रमाणे तहसीलदारांनीसुद्धा वेकोलिचे तत्कालीन महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांना ही घटना वेकोलिच्या कोळसा ब्लास्टिंगमुळे झाल्याचा अहवाल दिला. यानंतर धानकी कुटुंबाना वाटले की, आता मुलीचा तर जीव गेला परंतु, आपल्याला निवाºयाची सोय वेकोलि करणार. महिना गेला तोपर्यंत गावकºयांनी धानकी कुटुंबाना राहण्यासाठी ग्रामपंचायतमधील कार्यालयातील एक खोली राहण्यासाठी दिली. दिवस गेले, महिना गेला, परंतु, वेकोलि प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्यात न आल्याने विजय घागी हे अधिकाºयांच्या कार्यालयात फेºया मारत राहिले. परंतु, त्यांना उडवाउडवीची उत्तर देऊन परत पाठविण्यात येत होते.सततच्या पायपीटीमुळे त्रस्त झाल्याने विजयने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटी घेवून वेकोलिकडून न्याय देण्याची मागणी केली. मंत्र्यांनी अधिकाºयांना पत्र दिले. परंतु, आता अडीच वर्षांचा काळ लोटला असून त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.वेकोलि प्रशासनाने नेहमीप्रमाणे वेळकाढू धोरण राबवून निवारा हपरलेल्या धानकी कुटुंबावर एक प्रकारचा अत्याचार केला आहे. त्यामुळे मागील अडीच वर्षापासून या कुंटुबांना ग्रामपंचायत कार्यालयात वास्तव्य करावे लागत आहे.
घरकुलाअभावी धानकी कुटुंब अडीच वर्षांपासून ग्रामपंचायतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:15 AM
तालुक्यातील चारगाव येथे अडीच वर्षांपूर्वी वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे येथील विजय धानकी यांचे घर कोसळले. त्यात त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा मातीच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाला.
ठळक मुद्देब्लास्टिंगमध्ये कोसळले घर, मुलीचाही मृत्यू : वेकोलि व्यवस्थापनाने दिलेले नुकसानभरपाईचे आश्वासन हवेतच विरले