घोडपेठ : ग्रामपंचायत ताडाळी नागरी सुविधा अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती दिनेश चोखारे यांच्या प्रयत्नाने ताडाळी येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. त्या निमित्ताने शनिवारी पाहुण्यांच्या हस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय मंत्री तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक उपस्थित होते. तर उदघाटक म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे उपस्थित होते.ताडाळी येथील नागरिकांना सार्वजनिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी जागेची बरीच अडचण होत होती. मात्र आता शासकीय कार्यक्रम तसेच नागरिकांना लग्नसमारंभ, वाढदिवस तसेच सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी या सभागृहाचा वापर करता येईल, असे मत याप्रसंगी चंद्रपूर बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी व्यक्त केले.यावेळी जि.प. सदस्या सुरेखा पाटील, पं.स. सदस्य विलास चिवंडे, महेश मेंढे, रोशन पचारे, ताडाळीच्या सरपंच इंदिरा कासवटे, उपसरपंच क्रिष्णा बाम, ग्रा.पं. सदस्य सुबोध कासवटे, साईबाबा झाडे, ज्योतीबाई आसेकर, सुवर्णा सुरपाम, प्रकाश चिकराम, तालुका काँग्रेस कमेटी चंद्रपूरचे कार्याध्यक्ष नागेश बोंडे, येरूरचे सरपंच रमेश बुच्चे आदी उपस्थित होते.
ताडाळी येथे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 12:47 AM