लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील मूल मार्गावरील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सरकारनगर परिसरातील सगिरा अपार्टमेंटमधील एस-३ या फ्लॅटमध्ये चालणाºया कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून मुख्य महिला आरोपीसह वेश्या व्यवसाय करणाºया पाच महिला तसेच एका पुरूषाला अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.यावेळी पोलिसांनी आरोपी महिलांकडून २७ हजार ४०० हजार रूपये नगदी व नऊ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना चंद्रपुरातील सरकारनगर या उच्चभ्रू वसाहतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे डॉ. रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात तातडीने एक पथक तयार करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले.त्यानंतर पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी एक सापळा रचला. ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू आहे. त्या सगिरा अपार्टमेंटमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. पोलीस कर्मचारी असलेल्या या बनावट ग्राहकाला वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर संपूर्ण पथकाने सगिरा अपार्टमेंटमध्ये धाड टाकली.यावेळी पोलिसांनी कुंटनखाना चालविणाºया मुख्य महिलेसह पाच महिला तसेच सचिन घनोत याला अटक केली आहे.या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांकडून २६ हजार रुपये रोख व नऊ मोबाईल जप्त केले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वैरागडे, नितीन जाधव, विजय संगीडवार, महिला पोलीस प्रिया पोळे, सपना साखरे, सीमा तावाडे, आरती कच्चेवार, अमजद खान, शंकर मोटेकर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे करीत आहेत.
चंद्रपुरातील कुंटणखान्यावर एलसीबीची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:49 PM
येथील मूल मार्गावरील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सरकारनगर परिसरातील सगिरा अपार्टमेंटमधील एस-३ या फ्लॅटमध्ये चालणाºया कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून मुख्य महिला आरोपीसह वेश्या व्यवसाय करणाºया पाच महिला तसेच एका पुरूषाला अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
ठळक मुद्देमुख्य महिला ताब्यात : पाच महिला व एका पुरूषालाही अटक