लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : येथून पंधरा किमी अंतरावर असलेल्या सावरी (बीड.) व खापरी येथील शिवरामध्ये मागील दोन दिवसांपासून पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. यामुळे शेतकरी, मजूर भयभीत झाले असून ऐन पीक काढणीच्या हंगामात वाघाचे दर्शन होत असल्याने शेतीची कामे खोळंबली आहे.सोमवार रात्री शेतात जागल करीत असताना प्रमोद मेश्राम रा. खापरी या शेतकऱ्यास पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. मंगळवारी दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना वाघाने डरकाळी फोडल्याचा आवाज अनिल मगरे रा. सावरी (बीड.) या शेतकºयास ऐकू आला. या घटनेचे माहिती वनविभागाला देण्यात आली.यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतात कामे करण्याकरिता मजुरांसह शेतकरी घाबरत आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू आहेत.अशातच अचानक वाघाचे दर्शन होत असल्याने सर्व कामे खोळंबली आहेत. वनविभागाने कॅमेरे लावले आहेत.शेत परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू असून अनेकांची कामे रखडली आहेत.- रवी शेंडे (माजी उपसरपंच)ग्रा.पं. सावरी (बीड.)सुरक्षेच्या दृष्टीने वनकर्मचाऱ्यांची परिसरात गस्त सुरू असून, वाघाच्या हालचालींची एकही नोंद नाही. परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी.- भाविक चिवंडेवनपरिक्षेत्र अधिकारी, चिमूर
शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:56 PM
येथून पंधरा किमी अंतरावर असलेल्या सावरी (बीड.) व खापरी येथील शिवरामध्ये मागील दोन दिवसांपासून पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. यामुळे शेतकरी, मजूर भयभीत झाले असून ऐन पीक काढणीच्या हंगामात वाघाचे दर्शन होत असल्याने शेतीची कामे खोळंबली आहे.
ठळक मुद्देभीतीचे वातावरण : शेतीकामे खोळंबली