शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी नेत्यांकडून इच्छुकांची मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2021 5:00 AM

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी अनेकांनी दावा केल्याने तडजोडी करताना नेत्यांची दमछाक होत आहे. सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिवती नगर पंचायतीत एकाच प्रभागात आणि एकाच पक्षातील अनेकांनी उमेदवारी मागितल्याने तालुकास्तरावरील नेत्यांची दमछाक सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिवती नगर पंचायतीची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार आहे. दि. ७ डिसेंबरला नामनिर्देशन दाखल करण्याचा अंतिम दिवस असला, तरी कोरपना वगळता अजूनही पाच नगर पंचायतींसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून इच्छुकांची मनधरणी सुरू झाली आहे. तडजोडी झाल्या तर सोमवारी नामनिर्देशनासाठी गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी अनेकांनी दावा केल्याने तडजोडी करताना नेत्यांची दमछाक होत आहे. सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिवती नगर पंचायतीत एकाच प्रभागात आणि एकाच पक्षातील अनेकांनी उमेदवारी मागितल्याने तालुकास्तरावरील नेत्यांची दमछाक सुरू झाली आहे. उमेदवारी देताना वरिष्ठ नेत्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने दररोज बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक आधीपासूनच तयारीला लागले होते. मात्र, प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होताच अनेकांचा अपेक्षाभंग झाला. असे इच्छुक उमेदवार आता नवीन प्रभागातून उमेदवारी मिळावी यासाठी शक्ती पणाला लावत आहेत.

नामांकनासाठी दोन दिवस शिल्लक - ७ डिसेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. - छाननी ८ डिसेंबरला होईल तर १३ डिसेंबरला माघार घेता येईल. तसेच आक्षेप असल्यास  उमेदवारांना १६ डिसेंबरला अपील सादर      करता येणार आहे. - १६ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप व उमेदवारी मागे घेतल्यानंतर २१ डिसेंबरला मतदान होणार आहे.   

एकाच प्रभागात अनेकांचा दावा- सहापैकी केवळ कोरपना नगर पंचायतीत २० जणांनी नामनिर्देशन दाखल केले. यासाठी अंतिम तारीख ८ डिसेंबर असली, तरी प्रभागातील एकाच जागेवर अनेकांनी दावा केल्याने उमेदवारी द्यायची कुणाला, या प्रश्नाने नेते पेचात सापडले आहेत. - स्थानिक नेते आता जिल्हास्तरीय नेत्यांशी सल्लामसलतीसाठी धावपळ करत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायतीतही पोटनिवडणुकीची रणधुमाळीपोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी आणि ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात येईल. निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता जाहीर होईल. तसेच आवश्यक असल्यास २१ डिसेंबर रोजी मतदान होईल आणि २२ डिसेंबर रोजी मतमोजणी  होईल.

 

टॅग्स :Electionनिवडणूक