आॅनलाईन लोकमतकोरपना : जीवनात संघर्ष हा महत्त्वाचा घटक आहे. संघर्षातूनच अनेक असाध्य गोष्टी या साध्य केल्या जाऊ शकतात तेव्हा जोपर्यंत आपल्याला यशप्राप्ती होत नाही. तोपर्यंत संघर्षाला पूर्णविरात देऊ नका. आयुष्यात संघर्षच हा जगण्याला व लढायला शिकविते. त्यामुळे परिस्थितीच्या आडवळणांना बघून खचून न जाता सतत कार्यरत राहा असे प्रतिपादन राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोरपना येथे स्टुंडट फोरम गु्रपतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी केले.याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुर्लीधरराव गिरटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधरराव गोडे, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाऊराव कारेकर, कोरपना नगर पंचायतच्या नगराध्यक्षा नंदा विजय बावणे, गडचांदूर नगर परिषदच्या नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे, सतीश धोटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांनी रोजगार निर्माण करणाऱ्या शिक्षणाची कास धरून प्रगतीच्या वाटा निवडाव्या त्यात जिद्द, चिकाटी व तेवढेच परिश्रम घेण्याची ताकद ठेवावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी कृषी संबंधी मार्गदर्शन त्यांनी केले.
परिस्थितीशी लढ्याला शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:20 PM
जीवनात संघर्ष हा महत्त्वाचा घटक आहे. संघर्षातूनच अनेक असाध्य गोष्टी या साध्य केल्या जाऊ शकतात तेव्हा जोपर्यंत आपल्याला यशप्राप्ती होत नाही.
ठळक मुद्देसदा खोत : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर