शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

५०० मजुरांना वेशीवर सोडून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झाले मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 2:42 PM

कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही.

ठळक मुद्दे स्थलांतरित नागरिक परतले; मात्र आयुष्य होरपळले

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. याचा सर्वाधिक फटका जिवती तालुक्यातील मजुरांना बसला आहे. कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. क्वारंटाईनचे १४ दिवस जणू एखादी शिक्षाच हे मजूर भोगत आहे की काय, अशी भिषण परिस्थितीत ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आली.तालुक्यातील मालगुडा व इतर भागातील मोठ्या संख्येने मजूर रोजगारासाठी लातूर जिल्ह्यात गेले होते. मात्र कोरोनाचा हाहाकार माजला आणि कामधंदा बाजुला राहिला. दिवसभर काम करून प्रपंच भागविण्यासाठी हे मजूर इच्छा नसतानाही गाव सोडून गेले. मनात विविध स्वप्न बाळगून कुठल्याही सोयी-सुविधा नसताना श्रमाची कामे करून सुखी जीवन जगणाऱ्या या मजुरांना कोरोनाची लागण तर झाली नाही. मात्र कोरोनाचा अप्रत्यक्ष मार बसला आहे. लॉकडाऊनमुळे कारखान्याचा पट्टा पडला. घरी येण्याची घाई त्यात कोरोनाचे संकट. महिनाभर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एका शेतात कारखानदाराच्या आधारावर दिवस काढले. हाताला काम नसल्याने जवळ असलेले पैसेही संपून गेले. शासनाने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना स्वगावी पोहोचविण्याचे आदेश काढले. हातात दमडीही नसताना हिमतीने गाव गाठले. आरोग्य तपासणीही झाली. चौदा दिवस गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या दमपूर मोहदा येथील आश्रमशाळेत त्यांना क्वारंटाईन करून प्रशासन मोकळे झाले. ग्रामस्थ कशीबशी पोट भरण्यासाठी भाजीभाकरी देतात. मालगुडयातील ९० च्या जवळपास महिला-पुरूष मजूर व त्यांच्या सोबतीला असलेली त्यांची मुलेही नशिबाचे हे भोग भोगत आहेत. आधी महिनाभर लातूर जिल्ह्यात आणि १४ दिवस येथे विनाकारण बसून राहावे लागत असल्याने आता या मजुरांना मुलाबाळांच्यापोषणाची चिंता सतावत आहे. उन्हाळाभर लातूर जिल्ह्यात काम करून पदरात काही पैसे जमा होईल, असे या मजुरांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही.

स्थलांतरित मजुरांचा परतीचा ओघ सुरूचतालुक्यातून कामाच्या शोधात मजूर तेलंगणा राज्यातील खमम जिल्ह्यात मिरची तोडण्यासाठी तर काही मजूर ऊस तोडण्यासाठी गेले होते. आतापर्यंत तालुक्यात अठराशे मजूर स्वगावी पोहोचले असून तेराशे मजुरांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. आणखी ५०९ नागरिक अजूनही ठिकठिकाणी क्वारंटाईनमध्ये भोग भोगत आहेत.प्रस्तुत प्रतिनिधीने येथे क्वारंटाईन असलेल्या पांडुरंग तुकाराम आडे या मजुराला विचारणा केली असता गेल्या दीड महिन्यापासून आम्ही बसूनच असल्याने संसाराचा गाडा चालविणे कठीण जाणार असल्याचे त्याने सांगितले. जवळ असलेला पैसाही संपला. प्रशासनाने आणून सोडले मात्र पुढे कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे पुढील दिवस आता कसे काढायचे, अशी खंतही त्याने लोकमतजवळ व्यक्त केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस