तळोधी (बा) : तळोधी (बा) पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस सप्ताह साजरा करीत असताना शालेय विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेक सोनवने व पीएसआय जितेंद्र ठाकूर यांनी लोकविद्यालय महात्मा फुले विद्यालय, विश्वज्योती कॉन्व्हेंट स्कूल येथील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील सर्व शस्त्राची व कायदेविषयक माहिती दिली. ठाणेदार विवेक सोनवने यांनी पोलीस हा जनतेचा सेवक असून कायद्याचा भंग होणार नाही. तसेच महिलावरील अन्याय, अत्याचार टाळावे, याकरिता सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. (वार्ताहर)
पोलिसांकडून विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
By admin | Published: January 09, 2017 12:39 AM