आॅनलाईन लोकमतमाजरी : वेकोलिच्या माजरी क्षेत्रातंर्गत येणाºया माजरी उपक्षेत्रातील नागलोन-पाटाळा-२ मधील दोन कोळसा खाणींमधील उत्पादित कोळसा रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक करण्यासाठी रेल्वे कोल सायडिंग निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.यावेळी अनेक दुकाने व रेल्वेलगतची घरांना धोका होता. परिणामी परिसरातील शेकडो कुटुंबीयांचे नुकसान होणार होते. त्यामुळे प्रदूषण संघर्ष समितीने या कामाला विरोध केला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थीने यावर तोडगा काढण्यात आला.त्यामुळे सायडिंगची लांबी ९० मीटरने कमी करण्याला वेकोलि व रेल्वेच्या अधिकाºयांनी मान्यता दिली आहे.रेल्वे सायडिंगमुळे परिसरातील अनेकांच्या घराला धोका होता. तर बहुतेकाचे दुकान जाणार होते. परिमामी शेकडो कुटुंब रस्त्यावर येणार होते. रेल्वेलाइनजवळील काही घरे तोडण्याचे कामदेखील रेल्वे प्रशासनाने सुरू केले होते. त्यामुळे प्रदूषण मुक्त संघर्ष समिति माजरी च्या वतिने जि. प. सदस्य प्रवीण सुर, उल्हास रत्नपारखी, रवी कुद्दुला, राजेश रेवते, मुरलीप्रसाद रघुनंदन, चंद्रभान केसकर, गोल्ला कोमरय्या यांच्या नेतृत्वात शांततेत या सायडिंगला विरोध सुरू केला. पीडित कुटुंबीय संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सोबतच राष्ट्रीय मानवाधिकार अयोग, पीएमओ, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनाही निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली.त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे व जिल्हा खनिकर्म अधिकारी कांबळे यांनी एन.एच.आर.सी. व पी.एम.ओ. कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार रेल्वेचे अधिकारी, वेकोलिचे अधिकारी तसेच पीडित कुटुंबीय व वेकोली प्रशासन व प्रदूषण मुक्त संघर्ष समितिची बैठक वरोरा शासकीय विश्राम गृहात घेण्यात आली.या बैठकीला रेल्वेच्या नागपूर मंडळाचे ज्येष्ठ अभियंता ए.बी. चतुर्वेदी, वरोरा रेल्वेचे विभागीय अभियंता योगेश चतुर्वेदी, वेकोलिच्या स्थापत्य विभागाचे महाप्रबंधक जी. देवराजन, खाण प्रमुख के.डी.जैन, एस.पी.तिवारी, कुबेर सिंह व पीडित कुटुंबीयांतर्फे वीरेंद्रकुमार राय आदींची उपस्थिती होती.यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे एकूण सर्व मद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान रेल्वे सायडिंगची लांबी ९० मीटरने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नागरिकांचे हित लक्षात घेऊन कमीतकमी लांबीची ही सायडिंग तयार करण्याचे आश्वासनही वेकोलि आणि रेल्वेच्या अधिकाºयांकडून देण्यात आले.
वेकोलिच्या माजरी रेल्वे सायडिंगची लांबी कमी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:30 AM
वेकोलिच्या माजरी क्षेत्रातंर्गत येणाºया माजरी उपक्षेत्रातील नागलोन-पाटाळा-२ मधील दोन कोळसा खाणींमधील उत्पादित कोळसा रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक करण्यासाठी रेल्वे कोल सायडिंग निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी : ९० मीटरने कमी होणार