शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

बिबट्याचा बालिकेवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:34 AM

ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथील आठ वर्षीय बालिकेवर घराच्या समोर रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत जबड्यात पकडले. मात्र जवळच असलेल्या मुलीच्या वडिलांनी बिबट्याचा पाय पकडून त्याच्या जबड्यातून मुलीला सोडवण्याचा प्रयत्नात आरडाओरड केली.

ठळक मुद्देबंदोबस्त करण्याची मागणी : गावकऱ्यांच्या सतर्कतेने जीव वाचला

लोकमत न्यूज नेटवर्कगंगालवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथील आठ वर्षीय बालिकेवर घराच्या समोर रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत जबड्यात पकडले. मात्र जवळच असलेल्या मुलीच्या वडिलांनी बिबट्याचा पाय पकडून त्याच्या जबड्यातून मुलीला सोडवण्याचा प्रयत्नात आरडाओरड केली. लगेच गावकरी धावल्याने मुलीचे प्राण वाचले.एकाच आठवड्यात परिसरातील ही दुसरी घटना असल्याने गावकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.हा अंगावर शहारे आणणारा भयावह प्रसंग चिचगाव येथील ऐश्वर्या राजेश्वर अलोणे या बालिकेवर ओढवला. राजेश्वर अलोणे व मुलगी ऐश्वर्या जेवणानंतर गावातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याने घराच्या अंगणात उभे होते. त्याचवेळी अंधारात घराजवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने ऐश्वर्यावर हल्ला करीत ऐश्वर्याची मान जबड्यात पकडली. त्याच वेळी राजेश्वरने बिबट्याचा मागचा पाय पकडून मुलीचे प्राण वाचविण्यासाठी आरडाओरड सुरू केली व क्षणात गावातील लोक गोळा झाले. अखेर बिबट्याने जवळपास ३०० मीटर अंतरावर ऐश्वर्याला सोडले व जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. क्षणाचाही विलंब न लावता राजेश्वरने गावकऱ्यांच्या मदतीने जखमी अवस्थेत ऐश्वर्याला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. झाल्या प्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारीदेखील ग्रामीण रुग्णालयात आले. ऐश्वर्याच्या जखमांवर उपचार करण्यात आला. तिची प्रकृती आता चिंताजनक आहे. मात्र एकाच आठवड्यात परिसरात दोनदा बिबट्याने हल्ला केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.विजय वडेट्टीवारांनी घेतली दखलदरम्यान क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे एका कार्यक्रमानिमित्याने ब्रह्मपुरी येथे मुक्कामी होते. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. आ.वडेट्टीवार यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयात येताच ऐश्वर्याच्या उपचाराची व प्रकृतीची विचारपूस करीत आणखी चांगले उपचार करण्यासाठी मुलीचे वडील राजेश्वर यांना तात्काळ आर्थिक मदत केली.यावेळी उपस्थित वनविभागाचे अधिकारी यांना बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा. जंगलव्याप्त गावाशेजारील वाढलेले गवत काढून वन्यप्राण्यांना दबा धरण्यासारखी ठिकाणे नष्ट करा अश्या सूचना दिल्या.उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी आशा चौहान व नायगमकर यांनी मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च वनविभाग करेल व गावालगत असलेले गवत काढण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे आश्वस्त केले. यावेळी जि. प.सदस्य प्रा.राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, माजी नगरसेवक विलास विखार, गोवर्धन दोनाडकर, प्रा. श्याम कंरबे व चिंचगाव ग्रामवासीय उपस्थित होते.

टॅग्स :leopardबिबट्या