लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील अर्जुनी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेल्याचे शुक्रवारी दुपारी आढळून आले आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात या आठवडाभरात बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे. बिबट्याने एका आठवड्यात निरपराध नागरिकांवर केलेला हा चौथा हल्ला आहे.निर्मला श्रीरामे (५०) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.येथील भानुसखिंडी शिवारात शेतात कापूस वेचणी करत असताना अचानक बिबट्याने तिला मागून पकडले व ठार केले.याआधी वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी विजय झाडे हे शुक्रवारी सकाळी शेतातून घरी परत जात असताना दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला होता. यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. झाडे आपल्या शेतात रात्री जागलीसाठी गेले होते. सकाळी परत येत असताना झुडुपात दडलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. आपल्यावरील हल्ला कसाबसा परतवून लावत झाडे यांनी गावाकडे धाव घेतली. ही घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील आहे.रामदेगी येथे बिबट्याने सलग दोन दिवस दोन व्यक्तींचा बळी घेतला होता. यात बफर क्षेत्रात खेळण्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका युवकाला बिबट्याने ठार केले होते तर एका बुद्ध विहारात वास्तव्याला आलेल्या भन्तेजींचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या बिबट्याला पकडण्याची वनविभागाकडे नागरिकांनी मागणी केली आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले आहेत. मात्र तो त्यात अद्याप अडकलेला नाही. बिबट्याची दहशत या परिसरातील नागरिकांच्या मनावर जबरदस्त बसली आहे. त्याला तात्काळ पकडण्याची मागणी केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्या झाला सैराट; आठवड्यातील चौथा हल्ला, तिसरा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 2:05 PM
जिल्ह्यातील अर्जुनी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेल्याचे शुक्रवारी दुपारी आढळून आले आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात या आठवडाभरात बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे.
ठळक मुद्देनागरिक हादरलेबंदोबस्ताचे पिंजरे अद्याप रिकामे