लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शुक्रवारी रात्री ८ वाजतापासून मध्यरात्रीपर्यंत भद्रावती परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी बिबट आढळून आल्याने भद्रावतीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरम्यान बिबट्याने झडप घालून एका कुत्र्याला ठार केल्याची घटनाही घडली. काही ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसेही आढळून आले आहे.अत्यंत कमी कालावधीत हे बिबट शहराच्या छत्रपती नगर येथील बिएसएनएल कार्यालयाची भिंत, आयुध निर्माणी परिसर, सुमठाना रोड, पूजा टॉवर, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, मल्हारीबाबा सोसायटी या परिसरात आढळून आल्याने नेमके बिबट दोन होते की पाच याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. वनरपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नर व मादी असे दोन बिबट होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा मल्हारी बाबा सोसायटी येथे वावर आहे.रात्री ८ वाजता छत्रपतीनगरजवळील बीएसएनएल टॉवरजवळ असलेल्या भिंतीवर बिबट बसून असल्याचे तेथील रहिवासी सुभाष पायपरे यांनी पाहिले. त्यांनी लगेच नगराध्यक्ष अनिल धानोरकर, आरएफओ स्वाती महेशकर तसेच पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली. त्यानंतर थोड्याच अवधीत आयुध निर्माणी येथे कार्यरत दरबानांना बिबट चेकपोस्ट जवळून मुख्य रस्ता ओलांडून जात असल्याचे दिसले. रात्री ८.१५ च्या दरम्यान बिबट बालाजी मंदिराकडे पसार झाले. ८.३० वाजता पूजा टॉवरजवळ त्यांचे बस्तान होते, असे नागरिकांनी सांगितले. रात्री ९ च्या दरम्यान तहसील कार्यालयासमोरील आयुध निर्माणीच्या संरक्षण भिंतीवर बिबट उभा असल्याचे तहसीलचे कर्मचारी मंगेश चिटमलवार यांनी पाहिले. दुचाकीच्या लाईटचा प्रकाश सरळ बिबट्यावरच पडल्याने समोर बिबट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान झुडुपात दडून बसलेल्या बिबट्याने एका कुत्र्यावर झडप घेवून त्याला ठार केले. श्रीरामनगर येथील नागरिक यामीन अली आपल्या दोन कुत्र्यांना घेवून मानिका देवी मंदिरासमोरील रस्त्यावर फिरायला घेवून गेले होते. एक कुत्रा साखळीने बांधून होता तर दुसरा मोकळा होता. दडून बसलेल्या बिबट्याने मोकळा असलेल्या कुत्र्यावर झडप घातली. कुत्र्याचा आवाज आल्याने मागे वळून पाहिले असता अली यांना बिबट दिसला. बिबट्यांच्या वास्तव्यामुळे परसरात भीतीचे वातावरण आहे.तत्काळ बंदोबस्त करामल्हारीबाब सोसायटी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. वनविभागातर्फे कॅमेरे लावले आहेत. परंतु बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी या ठिकाणी तसेच ज्या परिसरात बिबट आढळून आले, त्याठिकाणी त्वरित पिंजरे लावण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी वनविभागाकडे केली आहे.
भद्रावती परिसरात बिबट्यांचे भ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 5:00 AM
रात्री ८ वाजता छत्रपतीनगरजवळील बीएसएनएल टॉवरजवळ असलेल्या भिंतीवर बिबट बसून असल्याचे तेथील रहिवासी सुभाष पायपरे यांनी पाहिले. त्यांनी लगेच नगराध्यक्ष अनिल धानोरकर, आरएफओ स्वाती महेशकर तसेच पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली. त्यानंतर थोड्याच अवधीत आयुध निर्माणी येथे कार्यरत दरबानांना बिबट चेकपोस्ट जवळून मुख्य रस्ता ओलांडून जात असल्याचे दिसले.
ठळक मुद्देजेरबंद करण्याची मागणी । नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण