तालुक्यातील सोळा गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात शेतीशाळेचे कृषी सहाय्यक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापकांमार्फत शेतीशाळा वर्ग सुरु आहे. तालुक्यात हरभरा पिकांचे क्षेत्र ४, ६२५ हेक्टर क्षेत्राची लागवड आहे.शेतकऱ्यांना बियाणे बीजप्रक्रिया यंत्राने किंवा पट्टा पद्धतीने पिकांची लागवड, आरोग्य पत्रिकेनुसार खताची मात्रा देणे, सापळा पिकांची लागवड, शत्रू व मित्र किडींची ओळख, हरभरा पिकाला स्प्रिंकल संचाने पिकाच्या योग्य वेळेस पाणी देणे, पक्षी थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे यांचा वापर करण्याबाबत प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावून सांगणे, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काचा वापर करणे व रासायनिक कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करणे, कीटकनाशकांचा मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञ मार्गदर्शक कडून मार्गदर्शन करण्यात आले. हरभरा पिकाची पेरणी ते काढणीपर्यंतचे संपूर्ण अद्यावत ज्ञान या शेतीशाळेत दिले जात आहेत. जमीन तयार करण्यापासून तर पेरणी ,खताची मात्रा, कीड व रोगनियंत्रण बद्दल माहिती, शून्य खर्चातील उपायोजना, अशा ज्ञानाची माहिती शेतीशाळेत देण्यात आली.
कृषी विभागाचे मोहिनी जाधव, यु .बी .झाडे, एस .सी . हिवसे, पी .बी. कटरे, डी.एम. दातारकर आदींनी मार्गदर्शन केले.
शेतीशाळा आयोजित करण्यासाठी शेती सेवा प्रकल्पाचे व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक, रवींद्र कोंगरे, शेतकरी मित्र यांचे सहकार्य लाभत आहे.