शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांनी फिरविली शाळेकडे पाठ

By admin | Published: November 15, 2014 10:44 PM

तालुक्यातील पानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत चार शिक्षक असताना त्यांपैकी एका शिक्षकाने शाळा समितीच्या बैठकीदरम्यान रेकॉर्ड फेकून शिस्तभंग केल्याने त्याची दुसऱ्या शाळेत तात्काळ

गोंडपिपरी : तालुक्यातील पानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत चार शिक्षक असताना त्यांपैकी एका शिक्षकाने शाळा समितीच्या बैठकीदरम्यान रेकॉर्ड फेकून शिस्तभंग केल्याने त्याची दुसऱ्या शाळेत तात्काळ बदली करण्यात आली. मात्र शिक्षण विभागाने गावकऱ्यांच्या मागणीनंतरही तेथे नव्याने शिक्षक न पाठविल्याने बालकदिनी पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेत गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. या घटनेमुळे शिक्षण विभागातील नवा गोंधळ चव्हाट्यावर आला असून जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी दखल घेवून शिक्षण विभागाची चांगलीच कानउघाडणी केली. १४ नोव्हेंबरच्या दुपारी ही घटना घटना घडली.पानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत एकुण चार शिक्षक कार्यरत आहेत. सदर शाळेत ३० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत येथील तत्कालिन शिक्षक कुणाल दुधे यांनी गोंधळ घालत रेकॉर्ड फेकले, अशा समिती पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून त्यांची चेकपिपरी येथे तात्काळ बदली करण्यात आली. या कारणामुळे पानोरा जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाची जागा रिक्त असल्याने गावकऱ्यांनी वारंवार पायपीट करून शिक्षण विभागाकडे रिक्त जागा भरण्याची मागणी केली असता शिक्षण विभागाने टाळाटाळ करून सदर गंभीर प्रकाराकडे कानाडोळा केल्याचे पानोरावासीयांचे म्हणणे आहे.आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शुक्रवारी पानोरा येथील पालकांनी बालकदिनाच्या पर्वावर पाल्यांना शाळेत न पाठविल्याने शिक्षण विभागातील गलथान कारभाराचा प्रत्यय आला. शाळेत विद्यार्थी न आल्याचे पाहून तेथे कार्यरत इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्याचे प्रयत्न चालविले. मात्र पालक शिक्षक देण्याची मागणीवर ठाम होते. त्यानंतर पालकांनी गोंडपिपरी पंचायत समिती कार्यालय गाठले. तेथे उपस्थित जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी सदर गंभीर प्रकाराची दखल घेवून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. शिक्षण विभागात चाललेल्या सावळ्या गोंधळाचा एक नवा प्रकार तेथे लक्षात आला.यात गोंडपिपरी येथील जि.प. कन्या शाळेतील अनिल पेंढारकर नामक शिक्षकाची चेकपिपरी येथे बदली होऊन तब्बल दोन महिन्याहून अधिक काळ लोटला असतानाही पेंढारकर हे गोंडपिपरी शाळेत अतिरिक्त शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची बाब उघडकीस आली. चेकपिपरी येथील रिक्त जागेवर पानोरा येथून दुधे यांना पाठवून पेंढारकरांना न पाठविण्यामागे कारण काय? असा प्रश्न जि.प. सदस्य बोडलावार यांनी उपस्थित केला. त्यावर शिक्षण विभाग कर्मचारी निरूत्तर झाले. एकंदरीत या सर्व प्रकारावरून शिक्षकाची रिक्त जागा व आवश्यकतेनुसार शिक्षकांना न पाठविता शिक्षकांना मनाप्रमाणे गावे दिली जात असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. (तालुका प्रतिनिधी)