लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नवनिर्मित जिल्हा कोषागार कार्यालय हे महाराष्ट्रातील उत्तम लेखा कोष भवन आहे. एका सुंदर व उत्तम कामासाठी पुरक पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाधान या ठिकाणी झाले पाहिजे. चंद्रपूरच्या ट्रेझरीने सहज, सुलभ व सरळ कामाचा वस्तुपाठ महाराष्ट्र पुढे उभा करावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात उभ्या झालेल्या गेल्या चार वर्षांतील अनेक नव्या इमारतींपैकी एक उत्कृष्ट इमारत म्हणून लेखा व कोषागार भवन पुढे आले आहे. महाराष्ट्रातील वित्त विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या इमारतीचे लोकार्पण केले.यावेळी आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, प्रधान सचिव नितीन गद्रे (लेखा व कोषागारे), जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता पाटील, संचालक ( लेखा व कोषागरे ) जयगोपाल मेनन, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, चंद्रपूर कोषागार अधिकारी ध.म.पेंदाम आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोषागार भवनाची मागणी आणि अनेक दिवसांपासून होती, हे विशेष.विक्रमी वेळात कामाची पूर्ततालेखा व कोषागारे विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांच्यामुळे विक्रमी वेळात ही इमारत उभी झाली. याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुक केले. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दिलेल्या काल मर्यादेच्या आत ही इमारत आम्ही पूर्ण करू की नाही याबाबत शंका होती. त्यामुळे सातत्यपूर्ण आपण पाठपुरावा केल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.इमारतीचे वैशिष्ट्यचार मजली वातानुकूलित ही इमारत असून वाहनतळ, विंधन विहीर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वयंचलित लिफ्ट, सीसीटीव्ही कॅमेरा, विश्रांतीकक्ष व चौथ्या मजल्यावरील सुसज्ज सभागृह हे या इमारतीचे वैशिष्ट्य आहे.
प्रत्येक माणसाचे समाधान व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 11:57 PM
चंद्रपूर जिल्ह्यातील नवनिर्मित जिल्हा कोषागार कार्यालय हे महाराष्ट्रातील उत्तम लेखा कोष भवन आहे. एका सुंदर व उत्तम कामासाठी पुरक पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाधान या ठिकाणी झाले पाहिजे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : अद्ययावत चंद्रपूर लेखा कोष भवनाचे लोकार्पण