शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

‘फायर वॉचर’ला बारमाह काम द्या

By admin | Published: July 11, 2016 12:51 AM

जंगलाला दरवर्षी आग लागत असते. तो वणवा विझविण्याचे काम फायर वॉचरकडे दिले जाते. ते काम संपल्यावर फायर वॉचरना वन खात्याने ...

रमेशचंद्र दहिवले : फायर वॉचर मेळावाचंद्रपूर : जंगलाला दरवर्षी आग लागत असते. तो वणवा विझविण्याचे काम फायर वॉचरकडे दिले जाते. ते काम संपल्यावर फायर वॉचरना वन खात्याने इतर कामे देऊन त्यांना बारमाही कामासाठी सामावून घ्यावे, अशी मागणी सीटूचे जेष्ठ नेते प्रा. रमेशचंद्र दहिवले यांनी केली.सीटू प्रणित विदर्भ वन कामगार संघटनेच्या वतीने फायचर वॉचरचा मेळावा बंडू उईके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी प्रा. दहिवले बोलत होते. ते म्हणाले की, वनविकास महामंडळ अंतर्गत फायर वॉचर गेल्या २५ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांना १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जंगलाला लागलेली आग विझविण्याच्या कामाकरिता लावण्यातयेते. नियमितपणे हे कामगार दरवर्षी कामावर येतात. वनविकास महामंडळात नवनवीन कामगारांना काम दिले जाते. मात्र फायर वाचरला जाणीवपूर्वक डावलण्यात येते. तेव्हा फायर वॉचरला बारमाही काम देण्यात यावे, असेही त्यांनी सागितले.प्रास्ताविक भाषणात मनोहर जुमनाके म्हणाले, उन्हाळ्यात कामगारांकडून जोडा व गणवेश यांचे माप घेण्यात आले. फायर सिझन संपून गेला तरी जोडे आणि गणवेश तर सोडाच टॉर्चदेखील फायर वाचरला देण्यात आला नाही. चरणदास मुंजनकर म्हणाले, आम्ही काम करण्यास तयार आहो. आमची सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन वनविकास महामंडळाचे कामावर आम्हाला घेण्यात यावे. रत्नपाल आत्राम यांच्या आभार प्रदर्शनाने मेळावा संपला. मेळावा यशस्वी करण्याकरिता सत्यपाल कुमरे, बंडू उथाने, कैलास नन्नावरे, तुलाराम भुरकुंडे, मारोती आत्राम, प्रभाकर टेकरे, रामचंद्र दुधलवार, कालीदास मंगाम, नियोगी नागदेवते यांनी विशेष परिश्रम घेतले, असे शरद ताजने यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)