बॉक्स
या असतील अटी
कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लसमुळे प्रशासकीय निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे लग्नसोहळ्याची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. लग्नसोहळ्यात केवळ ५० जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बॉक्स
परवानगीसाठी अग्निदिव्य
डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २८ जूनपासून विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. लग्नसोहळ्यासाठी शहरी भागात मनपा, नगरपालिका, नगर पंचायत तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाची मंजुरी घेणे गरजेचे आहे.
लग्नाची पत्रिका यासह आवश्यक ती माहिती संबंधित कार्यालयात देऊन परवानगी घ्यावी लागणार आहे. कधी कधी एका दिवसात परवानगी मिळते. तर कधी कधी तांत्रिक अडचणी आणि अधिकारी नसल्यामुळे परवानगीचे अग्निदिव्य पार पाडावे लागते.
लग्नसोहळ्याला केवळ ५० जणांची उपस्थिती गरजेची आहे. महसूल विभागाचे कर्मचारी लग्नमंडपी जाऊन तपासणी करणार आहेत. या वेळी गर्दी आढळून आल्यास दंड करण्यात येणार आहे.
कोट
वधू-वर पित्यांची कसरत
प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत सोहळा पार पाडणार आहोत. परंतु, परवानगी घेणे, कागदपत्र गोळा करणे यासाठी कसरत करावी लागत आहे. जेणेकरून मुलांचे लग्न करतोय म्हणजे गुन्हा करतोय की काय, असे वाटत आहे.
- सदानंद रायपुरे, वडील
------
कोरोनाची दहशत आहे, याची जाण आम्हाला आहे. परंतु, विविध अटी व शर्ती लावणे चुकीचे आहे. आयुष्यात एकदाच लग्न होते. सर्व आप्तेष्ठ व मित्रपरिवाराचा आशीर्वाद मिळावा, अशी अपेक्षा असते. परंतु, केवळ ५० जणांना परवानगी असल्याने ते शक्य नाही.
- संजय गरमाडे, वडील