कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय कार्यालयाचे कामकाज बंद होते. केवळ १५ टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. बहुतांश व्यवहार सुरळीत झाले आहे. परंतु, मागील काही महिने कामे ठप्प असल्याने चंद्रपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कामाचा व्याप वाढला आहे. अनेकांच्या परवान्याची मुदत संपली आहे. आता त्यांना परवाना नूतनीकरणासाठी ३० जूनपर्यंतचा कालावधील देण्यात आला आहे. परंतु, अपॉईंटमेंट घेतल्याशिवाय परवानगी देणे बंद आहे. अनेकांनी परवान्यासाठी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतली असल्याने सद्य:स्थितीत अपॉईंटमेंट फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. परंतु, प्रत्येकालाच नूतनीकरणाची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बॉक्स
असा आहे कोटा
चंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयांतर्गत कोरोना नियम पाळून गर्दी होऊ नये, म्हणून दररोज शिकाऊ उमेदवारांसाठी ७०, व कायम परवान्यासाठी प्रत्येकी ५० जणांनाच अपॉईंटमेंट देण्यात येत आहे. परंतु, या कालावधीत ज्याचा परवाना नूतनीकरण होणार नाही, त्याना दिवस वाढवून देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही कार्यालयात विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------
बॉक्स
तापमान तपासूनच प्रवेश
कार्यालयात जे व्यक्ती कामानिमित्त येतात. त्या प्रत्येकांचे तापमान तपासून त्यांची नोंद करून प्रवेश दिला जातो. मास्क घालून नसल्यास त्याला प्रवेश नाही. कार्यालयात सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. घोळका करून बसण्यावर निर्बंध घातले आहेत.
--------
बॉक्स
अशी घ्या अपॉईंटमेंट
ज्यांचा परवाना नूतनीकरण करायचा आहे. किंवा इतर कामे करायची आहेत. त्यांना अपॉईंटमेंट घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करून कामाच्या तपशीलबाबत माहिती भरून अपॉईंटमेंट करणे गरजेचे आहे.
कोट
परिवहन अधिकारी म्हणतात...
कोरोनाचे नियम पाळून कामे करण्यात येत आहेत. ६० टक्के कामे पूर्वपदावर आली आहेत. मुदत संपलेल्यांना वाहन परवान्यांची मुदत ३० जूनपर्यंत वाढवून दिली आहे. नूतनीकरणासाठी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेणे गरजेचे आहे. सर्वांचे नूतनीकरण करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही कार्यालयात गर्दी करू नये, तसेच मास्क घालून कोरोनाच्या नियमांचे पालन करून कार्यालयात यावे.
-किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर