लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंद होते. त्यामुळे अनेकांचे परवान्याची मुदत संपली आहे, अशाना ३० जूनपर्यंत नुतनीकरणाचा कालावधी वाढवून दिला आहे. परंतु, त्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन नुतनीकरण करावे, लागणार आहे. सध्यास्थितीत अपॉईंटमेंट फुल्ल झाल्याचे दिसून येत असल्याने नुतनीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय कार्यालयाचे कामकाज बंद होते. केवळ १५ टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. बहुतांश व्यवहार सुरळीत झाले आहे. परंतु, मागील काही महिने कामे ठप्प असल्याने चंद्रपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कामाचा व्याप वाढला आहे. अनेकांच्या परवान्याची मुदत संपली आहे. आता त्यांना परवाना नुतनीकरणासाठी ३० जूनपर्यंतचा कालावधील देण्यात आला आहे. परंतु, अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय परवानगी देणे बंद आहे. अनेकांनी परवान्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली असल्याने सध्यास्थितीत अपॉइंटमेट फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. परंतु, प्रत्येकालाच नुतनीकरणाची संधी देण्यात येणार आहे.
तापमान तपासूनच प्रवेशकार्यालयात जे व्यक्ती कामानिमित्त येतात. त्या प्रत्येकांचे तापमान तपासून त्यांची नोंद करुन प्रवेश दिला जातो. मास्क घालून नसल्यास त्याला प्रवेश नाही. कार्यालयात सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. घोळका करुन बसण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
अशी घ्या अपॉइंटमेंटज्यांचा परवाना नुतनीकरण करायचा आहे. किंवा इतर कामे करायची आहेत. त्यांना अपाइंटमेंट घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जावून आपली नोंदणी करुन कामाच्या तपशिलाबाबत माहिती भरुन अपॉइंटमेंट करणे गरजेचे आहे.
असा आहे कोटाचंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयातंर्गत कोरोना नियम पाळून गर्दी होऊ नये, म्हणून दररोज शिकाऊ उमेदवारांसाठी ७०, व कायम परवान्यासाठी प्रत्येकी ५० जणांनाच अपॉंइटमेंट देण्यात येत आहे.
परिवहन अधिकारी म्हणतात...कोरोनाचे नियम पाळून कामे करण्यात येत आहेत. ६० टक्के कामे पूर्वपदावर आली आहेत. मुदत संपलेल्यांना वाहन परवान्यांची मुदत ३० जूनपर्यंत वाढवून दिली आहे. नुतनीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे गरजेचे आहे. सर्वांचे नुतनीकरण करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही कार्यालयात गर्दी करु नये, तसेच मास्क घालून कोरोनाच्या नियमांचे पालन करुन कार्यालयात यावे.-किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर