लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे येथील उपप्रादेशिक कार्यालयाकडून लर्निंग (शिकाऊ) परवाना व नियमित परवाना ही कामे बंद होती. लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळात उपप्रादेशिक कार्यालयातून शिकाऊ परवान्यासाठी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा व नियमित परवान्यासाठी होणारी चाचणीही बंद होती. ही बंद असलेली प्रक्रिया आता सुरु झाली असून उमेदवार परवाना मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज भरत आहेत.लर्निंग (शिकाऊ) परवाना मिळविण्यासाठी ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. परंतु त्या परिक्षेसाठी आधी परीरक्षेची तारीख आपल्या सोईनुसार घ्यावी लागते. मिळालेला शिकाऊ परवाना महिनाभरानंतर ते सहा महिन्यांच्या आत नियमित परवाना करण्यासाठी वाहन चाचणी घ्यावी लागते. मार्च महिन्यापर्यंत ही सर्व कामे सुरु होती. परंतु कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन झाल्याने उपप्रादेशिक कार्यालय देखील बंद करण्यात आले. शासनाचे नवीन निर्देश येईपर्यंत ज्या वाहनांच्या तपासणींचा कालावधी संपनार होता. तो सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आला. तर शिकाऊ परवाना व नियमित परवाने देणे बंद ठेवण्यात आले होते. परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्याने २२ जूनपासून येथील उपप्रादेशिक कार्यालयातील हे काम सुरु करण्यात आले आहे. शिकाऊ परवान्यासाठी दिवसातून एक- एक तासाचे लॉट तयार करण्यात येत आहे. एका लॉटमध्ये १० जणांची परिक्षा घेतली जाते. असे एका दिवसात ६० जणांची परीक्षा घेतली जात आहे. विशेष म्हणजे, प्रत्येकवेळी सॅनिटायझर केले जात आहे. ज्यांची वाहन चाचणी आहे अशा उमेदवारांना वाहनाचे सॅनिटायझर करूनच चाचणी घेतली जात आहे.जड वाहनांना फिटनेसकरिता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यामुळे फिटनेसकरिता जड वाहने येत नाहीत. तर अन्य उर्वरित कामेही आता सुरळीत सुरु करण्यात आली आहे.
आरटीओतून परवाना देण्याचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 5:00 AM
लर्निंग (शिकाऊ) परवाना मिळविण्यासाठी आॅनलाईन परीक्षा द्यावी लागते. परंतु त्या परिक्षेसाठी आधी परीरक्षेची तारीख आपल्या सोईनुसार घ्यावी लागते. मिळालेला शिकाऊ परवाना महिनाभरानंतर ते सहा महिन्यांच्या आत नियमित परवाना करण्यासाठी वाहन चाचणी घ्यावी लागते. मार्च महिन्यापर्यंत ही सर्व कामे सुरु होती. परंतु कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन झाल्याने उपप्रादेशिक कार्यालय देखील बंद करण्यात आले.
ठळक मुद्देउमेदवारांची होत आहे गर्दी : लॉकडाऊनमुळे ठप्प होते काम