आॅनलाईन लोकमतनागभीड : मागील वर्षी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले ‘ते’ तिघे अद्यापही मरणयातना भोगत असून वनविभागाचे त्यांच्याकडे पूर्णपणे डोळेझाक झाली आहे. वनविभागाच्या या धोरणाबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.गतवर्षी १३ मे रोजी तळोधी वनपरिक्षेत्रातील किटाडी- खरकाडा जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात रंजना राऊत, बिसन कुळमेथे व फारूख शेख हे तिघे ठार तर सचिन कुळमेथे, मीना राऊत व कुणाल राऊत हे तिघे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर या जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर या जखमींना घरी पाठविण्यात आले.त्यांना घरी पाठविण्यात आले असले तरी त्यांचा दुर्दैवाने दशावतार सुरूच आहेत. त्यांच्या जखमा अद्यापही बºया झालेल्या नाहीत. उपचारासाठी त्यांना महिन्यातून तीन वेळा नागपूरला जावे लागत आहे. मीना व कुणालच्या डोळ्यांना गंभीर जखमा असल्याने त्यांच्या डोळ्याच्या जखमेतून अद्यापही द्रव वाहत असते. त्यामुळे त्यांना अंधत्व येण्याची भीती सतावत आहे. तर सचिनच्या पायाला जबर जखम आहे.हातावर आणून पानावर खाणारे हे लोक असून महिन्यातून तीन वेळा नागपूरला जाऊन उपचार करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पण जीवाच्या भीतीने कशी तरी काटकसर करून ते नागपूरला जाऊन उपचार करत आहेत. दुधराम राऊत यांनी पत्नी आणि मुलाच्या उपचारासाठी घरच्या २० ते २५ शेळ्या विकून उपचार सुरू ठेवला आहे. सचिनच्या कुटुंबियांचीही हिच अवस्था आहे. मात्र वनविभागाने त्यांच्याकडे पूर्णत: पाठ फिरविली असून उपचारासाठी वनविभागाने त्यांना आतापर्यंत कवडीचीही मदत केली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.उपचार करण्यासाठी महिन्यातून तीन वेळा पत्नी व मुलाला नागपूरला न्यावे लागते. आतापर्यंत घरच्या शेळ्या विकून उपचार केला. आता उपचार करणे आवाक्याबाहेर जात आहे. वनविभागाने आमची अडचण समजून घ्यावी व मदत करावी.- दुधराम राऊतपीडित.
अस्वल पीडितांना मरणयातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:03 PM
मागील वर्षी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले ‘ते’ तिघे अद्यापही मरणयातना भोगत असून वनविभागाचे त्यांच्याकडे पूर्णपणे डोळेझाक झाली आहे.
ठळक मुद्देदुर्लक्षित : वर्षभरापासून वनविभागाकडून आर्थिक मदतीची प्रतीक्षा