शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

रक्तदानाच्या माध्यमातून ते करतात जीवनदानाचे कार्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:49 AM

समाजामध्ये वावरत असताना समाजाप्रति आपले काहीतरी देणे लागतो, या भावनेने खूप कमी लोक कार्यरत असतात. यापैकीच कार्यरत असलेले खडसंगी येथील बहुजन विचार बहुउद्देशीय संस्थेचे हे युवक खडसंगी परिसरात विविध सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत.

ठळक मुद्देसंकटकाळी रुग्णाकरिता देवदूतच : खडसंगी येथील युवकांची कामगिरी

आशीष गजभिये ।लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : समाजामध्ये वावरत असताना समाजाप्रति आपले काहीतरी देणे लागतो, या भावनेने खूप कमी लोक कार्यरत असतात. यापैकीच कार्यरत असलेले खडसंगी येथील बहुजन विचार बहुउद्देशीय संस्थेचे हे युवक खडसंगी परिसरात विविध सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांपैकी महत्वाचा उपक्रम म्हणजे ‘रक्तदान’. माणुसकीच दर्शन घडवत रक्ताची गरज असणाऱ्या व्यक्तीच्या हाकेला ओ देत त्यांना रक्त देऊन जीवनदान करण्याचे कार्य हे युवक नियमितपणे करीत आहेत.दिवसेंदिवस वाढणारे अपघात, सिकलसेल, प्रसुतिच्या वेळेस येणाºया समस्या, विविध शस्त्रक्रिया व इतर कारणांनी रुग्णांना नेहमीच रक्ताची गरज भासते. पण अनेकदा रुग्णालयात आवश्यतेनुसार रक्ताचा साठा उपलब्ध नसतो. ही समस्या लक्षात घेत या समस्येवर मार्ग काढत खडसंगी येथील युवकांचा गट आता माणुसकीची जाणीव ओळखून आळीपाळीने नियमित रक्तदान करून जीवनदानाचे महान कार्य करीत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत आहेत.या युवकांनी सोशल मीडियावर एक ग्रुप तयार केला असून या माध्यमातून त्यांच्या संपर्कात येणाºया प्रत्येक व्यक्तीस ते रक्ताची मदत करीत आहेत. परिसरात आरोग्याच्या चांगल्या सेवा उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथील रुग्णालयात रेफर केले जाते. अनेकदा रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होतो. डॉक्टरांनी रक्ताचा सल्ला दिल्यानंतर अनेकदा रक्तपेढीत रक्तसाठा उपलब्ध नसतो. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. अशाच रुग्णांची मदत हे युवक करीत असून अनेकदा त्यांनी स्वखचार्ने वर्धा, चंद्रपूर, नागपूर येथील रुग्णालयात जाऊन रक्तदान केले आहे. अनेक रुग्णांना रक्ताच्या जीवघेण्या संकटाच्या वेळेत त्यांनी रक्तदान करून जीवनदान केले आहे. त्यांच्या या कार्याने ते रुग्णाकरिता संकटकाळी जणू देवदूतच ठरत आहेत.रक्तदान करण्याविषयी ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या मनात गैरसमज आहेत. ही समस्या लक्षात घेऊन या युवकांनी रक्तदान ही चळवळ निर्माण व्हावी व नागरिकांच्या मनात रक्तदानाविषयी असलेला गैरसमज दूर करण्याविषयी जनजागृती सुरू केली. मागील तीन वर्ष्याच्या काळापासून या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत रक्तदान करून अनोख्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्याची प्रथाच या युवकांनी परिसरात सुरू केली आहे. मागच्या तीन वर्षांपासून खडसंगी येथे शिवजयंतीला रक्तदान शिबिराचे आयोजन यांच्या माध्यमातून केले जात आहे.यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाºयांचा रक्तदानाविषयी मार्गदर्शन हा कार्यक्रम असतो. रक्तदानाविषयी नागरिकांत असलेले गैरसमज या कार्यक्रमातून सोडविले जातात. त्यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो नागरिकांनी रक्तदान केले आहे. यामध्ये परिसरातील विविध लोकप्रतिनिधीसह, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवित रक्तदान केले आहे.दरवर्षी रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत असून परिसरातील नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व या युवकांच्या माध्यमातून कळत आहे. असा उपक्रम राबवून हे युवक रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदानाचे महान कार्य यांच्या पुढाकाराने करीत आहेत.परिसरात रक्तदान ही चळवळ निर्माण व्हावी व नागरिकात असलेले गैरसमज दूर व्हावे, या संकल्पनेने आम्ही कार्यरत असून आमच्यापर्यंत रक्ताकरिता पोहचणाºया प्रत्येकाची आम्ही मदत करीत आहोत. या कार्यामध्ये बाकी नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे.- प्रशांत मेश्राम (सचिव)बहुजन विचार बहू. संस्था,खडसंगीसमाज कार्यातही अग्रेसरजनकल्याणासाठी झटणाऱ्या महापुरुषांच्या जयंत्या, विविध सनाचे औचित्य साधत खडसंगी परिसरात या युवकांच्या माध्यमातून गरजू विध्यार्थ्यांना पेन व वही वाटप, ग्रामीण कलाकारांच्या गुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा, वृक्षारोपण अशी अनेक सामाजिक उपक्रम यांच्या वतीने खडसंगी परिसरात राबविली जातात. त्यांना या आता कार्यात परिसरातील नागरिकांची साथ हळूहळू लाभत आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी