लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : विविध क्षेत्रात उदासिनता असली तरी ब्रह्मपुरीत सामाजिक, सांस्कृतिक दायित्वाचे भान दिसून येते. यातून जीवनाला आनंद मिळतो, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी केले. झाडीबोली साहित्य मंडळ व पत्रकार संघाच्या स्वागत मंगल कार्यालयात पार पडलेल्या हास्यकवी संमेलनात उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी नगरपरिषदचे उपाध्यक्ष अशोक रामटेके तर प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. एन. एस कोकोडे, अभिनेते हिरालाल पेंटर धनराज मुंगले, प्रा. डॉ धनराज खानोरकर, प्रा. डॉ. रवी रणदिवे, सुरेश डांगे, साहित्य मंडळाचे अध्यक्ष अमरदीप लोखंडे उपस्थित होते. पोलिस निरीक्षक मकेश्वर म्हणाले, हसण्यासारखा नि:शुल्क व्यायाम दूसरा नाही. असे उपक्रम शहराचे सांस्कृतिक वैभव वाढवितात. प्राचार्य डॉ. कोकोडे, हिरालाल पेंटर, मुंगले यांनी विचार व्यक्त केले. हास्य कवी संमेलनात नागपूर, चंद्र्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, ब्रह्मपुरी येथील कवी सहभागी झाले. प्रास्ताविक डॉ. खानोरकर, संचालन मंगेश जनबंधू यांनी केले. आभार अमरदीप लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. मंजुषा साखरकर, तुलेश्वरी बालपांडे, शशी मदनकर, सुनिल झाडे, राहुल मैंद गुरुदेव अलोने व तालुक्यातील रसिक उपस्थित होते.
कलेतून जीवनाला मिळतो आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:09 PM
विविध क्षेत्रात उदासिनता असली तरी ब्रह्मपुरीत सामाजिक, सांस्कृतिक दायित्वाचे भान दिसून येते. यातून जीवनाला आनंद मिळतो, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी केले. झाडीबोली साहित्य मंडळ व पत्रकार संघाच्या स्वागत मंगल कार्यालयात पार पडलेल्या हास्यकवी संमेलनात उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
ठळक मुद्देप्रमोद मकेश्वर : हास्य कवी संमेलनाने रसिक अंतर्मुख