बॉक्स
तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्सच जास्त
एक लिटर पेट्रोेल ग्राहकांना ९८.७६ रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. वास्तविक त्याची मूळ किंमत जवळपास ३५ ते ३८ रुपये आहे. विविध टॅक्समुळे त्याची किंमत वाढत आहे. इंधनावर जवळपास ६४ टक्के करू असून त्यामध्ये २४ टक्के केंद्र व उर्वरित ४० टक्के राज्य सरकारचे कर आहेत. आयात शुल्क, डीलर कमिशन व इतर कर आकारले जात असून त्याचा सर्व भार ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
कोटमागील काही वर्षांत पेट्रोलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकीचा वापर करणे परवडण्यासारखे नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असतानाही पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ करणे चुकीचे आहे. त्यामुळे इतरही व्यवसायावर फरक पडत आहे.
-अमोल गेडाम, कापड व्यावसायिक
------
डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्याने वाहतुकीचे दर वाढविण्यात आले. फळांच्या खरेदीच्या जवळपासच वाहतूक दरही विक्रेत्याकडून आकारण्यात येतात. त्यामुळे फळांच्या किमती वाढत आहेत. त्यातच कोरोना संकटामुळे आर्थिक फटका बसत आहे.
-आदित्य रामटेके, फळ विक्रेता
----
पूर्वी एक ते दीड महिन्यात पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत होती. मात्र, आता ही नित्याचीच बाब झाली आहे. परिणामी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
-नितीन सहारे, चंद्रपूर
बॉक्स
पेट्रोल दर (प्रति लिटर)