घाटावरून कोसळताहेत दगड : मोठ्या अपघाताची भीती
अनवर खान
पाटण : जिवती तालुक्यातील पाटण-शेणगाव-जिवती हा राज्यमार्ग आहे. या मार्गाची सध्या दैनावस्था झाली आहे. थातूरमातूर खड्डे बुजविण्याचे काम केले जाते. त्यामुळे रस्त्याची पूर्णपणे दुरुस्ती कधीच होऊ शकली नाही. प्रवाशांना या मार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गडचांदूरपासून पहाडावर जाताना भेंडवी घाटातून प्रवास करताना भूस्खलन होऊन दगड खाली घसरतात . अशी परिस्थिती पावसामुळे होते. वरून माती व दगड खाली पडत असल्यामुळे एखाद्यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ता ३० ते ४० गावाकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. या घाटावर अनेकदा छोटेमोठे अपघात घडले आहेत. काही वेळा हा रस्ता ठप्प झाला आहे. तरीदेखील प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते. या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असली तरी अजून काम घाटापर्यंत आलेले नाही. काम कासवगतीने सुरू आहे. यासोबतच संपूर्ण जिवती तालुक्यातील रस्त्याचीच दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना धोकादायक रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे.
260721\img_20210616_065127.jpg
पहाडावरील गावाचा रस्त्याचा प्रवास जीवघेणा