शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दलितवस्तीत उजळला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:33 AM

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्रामस्वराज्य अभियान : महावितरणने फुलविले १३२४ चेहऱ्यांवर हास्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत एकूूण १३२४ चेहºयांवर हास्य फुलविण्यात महावितरणचे चंद्रपूर परिमंडळ यशस्वी ठरले आहे.या अभियानांतर्गत चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील येल्लापूर येथे १३८, गुडसेल्ला येथे ११० व कुंभेझरी येथे १६६, चिमूर तालुक्यातील वडसी येथे ५२, ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे १७, चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथे ३४ व गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे ७ घरात वीज जोडणी करण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक येथे ७०, अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे १११, महागाव येथे ८३, चेरपल्ली येथे ६२, गोंिवंदगाव येथे ६०, सिरोंचा तालुक्यातील नाडीगुडा येथे १७१, जाफराबाद येथे १३९ व गुमलकोंडा येथे १०४ गावात वीज जोडण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ८०० व चंद्रपूर जिल्ह्यातील ५२४ अशा एकूण १३२४ गरीब घरात प्रकाशाची किरणे पोहोचल्यामुळे त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले आहे.राज्यभरातील १०२ गावात हे अभियान राबविण्यात येत असून यात विदर्भातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील ज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा १९२ गावात शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यात विदर्भातील १४० गावांचा समावेश आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबिर लावण्यात आले आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येत आहे. उज्ज्वला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते वीजजोडणी व एलईडी बल्ब प्रदान करण्यात आले.उद्दिष्ट करणार पूर्णपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता हरीश गजबे व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हसके यांच्या मार्गदर्शनात संबंधित विभाग व उपविभाग वीज जोडणी देण्याचे दायित्व पार पाडत आहे. दरम्यान, शासनाने दिलेले उद्दिष्ट महावितरणच्या वतीने पूर्ण केले जाईल, अशी माहिती येथील महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली.

टॅग्स :electricityवीज