शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

७० लाखांची दारू अन् गुटखा जप्त; ९० जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 1:49 PM

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: चार महिन्यात ९० जणांना ठोकल्या बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू विक्रेते व अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. मागील चार महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध ११ कारवाया करुन १८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ४८ लाख ४२ हजार ८२५ रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. अवैध दारू विक्रीच्या ७१ कारवाया करुन ७२ जणांना बेड्या ठोकल्या असून २२ लाख ६२ हजार ९८५ रुपयांची दारू जप्त केली आहे. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली असली तरीही अनेकजण सुगंधित तंबाखूची विक्री करत आहेत. त्यामुळे कारवाई करण्यात आल्या.

९० जणांवर कारवाईस्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखू व अवैध दारू विक्रेत्यांविरुद्धची मागील चार महिने केलेल्या कारवाईची आकडेवारी बघितल्यास तब्बल ७१ लाख पाच हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ९० जणांना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली.

निवडणुकीनंतर कारवाईला गती१९ एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईला खरा वेग आला आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात अवैध व्यावसायिकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सुगंधित तंबाखू, रेती तस्करी, अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली.

काय जप्त केले?इगल, हुक्का अन् गुटखा : मागील चार महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन इगल, हुक्का, गुटखा असा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.२२ लाखांची दारू जप्त : १ जानेवारी ते एप्रिल २०२४ या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ लाख ६२ हजार ९८५ रुपयांची दारू जप्त केली आहे.

अवैध रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या :जिल्ह्यात शिवसेना कोणाच्या बाजूने आहे? सेना जिल्हाप्रमुख, आणि तालुका प्रमुखांची भूमिका काय? त्यांच्याशी बोलून आहे. आणि तालुका प्रमुखांची भूमिका काय? त्यांच्याशी बोलून आहे. आणि तालुका प्रमुखांची भूमिका काय? त्यांच्याशी बोलून आहे. शहरप्रमुख आणि तालुका आहे.

अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणलेस्थानिक गुन्हे शाखेच्या सततच्या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हाभरात पोलिसांची सुरु आहे गस्तस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण जिल्हाभरात गस्त सुरु केली असून कारवाई करण्यात येत आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीchandrapur-acचंद्रपूर