शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:27 PM

अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देज्ञानेश्वर वाकुडकर : राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी व्यक्त केले.राज्यस्तरीय तिसऱ्या अभंग साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून गडचांदूर नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, स्वागताध्यक्ष समाजसेवक गिरीधर काळे, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, पूर्वाध्यक्ष साहित्यिक मनोज बोबडे, ज्येष्ठ समीक्षक श्याम मोहोरकर, त. मु. अध्यक्ष शंकर अस्वले आदी उपस्थित होते. यावेळी अक्षर वाङमय पुरस्कार वितरण करण्यात आले. कवी गणेश भाकरे यांना अक्षरबाल वाङमय पुरस्कार, लातुर येथील कवी, लेखक डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांना अक्षर वाङमय समीक्षा पुरस्कार प्रा. नवनाथ गोरे यांना कादंबरी पुरस्कार, संघमित्रा खंडरे यांना कथा पुरस्कार, चंद्रकांत पोतदार यांना काव्य पुरस्कार, शंकुतला सोनार यांच्या चरित्र पुरस्कार तर रश्मी गुजराथी यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर उमेश पारखे यांच्या ‘शुन्यात शोधतो मी’ कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अक्षर साहित्य कला प्रतिष्ठाणच्या वतीने कवी उमेश पारखी यांना नवांकुर पुरस्कार, समाजसेवक रामचंद्र पावडे यांना राष्टÑसंत सेवा पुरस्कार, मनोज भोजेकर यांना अक्षर कार्यकर्ता पुरस्कार, सदानंद बोरकर यांना नाट्यकलावंत पुरस्कार तर मयुर ऐकरे यांना अक्षर कला पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक कवि किशोर कवडे यांनी केले. संचालन कवी रत्नाकर चटप तर आभार कवी अविनाश पोईनकर यांनी मानले. यावेळी राज्यभरातील कवी, साहित्यिक, गझलकार तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामदिंडीने दुमदुलले बिबी गावतिसऱ्या अभंग साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी बिबी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्यिकांसह जि.प. शाळेचे विद्यार्थी शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी सहभागी झाले. भजन आणि अभंगांनी गावकºयांची मने जिंकली.