सिंदेवाही : पंचायत समितीला रिक्त जागाचे ग्रहण लागलेले असल्याचे चित्र आहे. परिणामी, कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाचा भार वाहून न्यावा लागत असल्याचे चित्र आहे. जागांकडे प्रशासनाचे लक्ष नसले तरी शिक्षण विभाग प्रभारी असून, तीन केंद्रप्रमुख आठ केंद्राचा गाडा चालवीत आहेत.
कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षक शाळेत येत आहेत. विद्यार्थ्यांच्या घराला भेटी देत आहेत. दोन ते चार विद्यार्थी शाळेत बोलवून शिक्षण देत आहेत. एक वर्षाच्या काळात शैक्षणिक कार्य झाले नसल्याने विद्यार्थ्यांना मागील शिक्षणाचा विसर पडल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. सिंदेवाही पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत आठ केंद्र आहेत. जात ९० शाळांचा समावेश आहे. आठ केंद्रप्रमुख असणाऱ्या सिंदेवाही पंचायत समितीत आता तीन केंद्रप्रमुख हा कारभार पाहत आहेत. तर पाच केंद्राचा प्रभार काही केंद्रप्रमुख तर काही पदवीधर शिक्षकाकडे प्रभार देण्यात आला आहे.
बॉक्स
रिक्त असलेले पाच केंद्र
सिंदेवाही, मोहाडी, शिवनी, पळसगाव, गडबोरी आदींचा समावेश आहे. विस्तार अधिकाऱ्यांचीसुद्धा दोन पदे रिक्त आहेत. सध्या गटशिक्षण अधिकारी प्रभारी आहेत. त्यामुळे या विभागात कामकाजावर परिणाम दिसून येत आहे.