लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफीच्या पहिल्या यादीत तालुक्यातील १०९ गावांतील ४ हजार ४७९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. कर्ज माफीची पहिली गाव निहाय यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात का होईना हास्य फुलले आहे.ब्रम्हपुरी तालुका धान पिकासाठी ओळखला जातो. खरीप हंगामात ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज भरण्याचा तसेच भविष्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता. यानंतर सर्वस्तरावर शेतकऱ्यांना मदतीची मागणी होऊ लागली. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कर्जमाफीची घोषणा केली. मात्र याला विलंब झाल्याने विरोधीपक्षांसह शेतकऱ्यांमध्येही अस्वस्थता पसरली होती.दरम्यान महाविकास आघाडी सरकारने गावनिहाय कोणत्या बँकेत किती कर्ज माफ करण्यात आले याची यादी प्रकाशित केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकरी याद्या बघण्यासाठी धडपडत आहे.यांना मिळणार नाही लाभआजी, माजी मंत्री किंवा राज्यमंत्री, लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य, विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, ज्यांचे मासिक वेतन २५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्तीनिवृत्त व्यक्ती ज्यांच मासिक वेतन २५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी दूध संघ यांचे अधिकारी, ज्यांच मासिक वेतन२५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
ब्रह्मपुरीत ४ हजार ४७० शेतकऱ्यांना कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 6:00 AM
ब्रम्हपुरी तालुका धान पिकासाठी ओळखला जातो. खरीप हंगामात ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज भरण्याचा तसेच भविष्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता. यानंतर सर्वस्तरावर शेतकऱ्यांना मदतीची मागणी होऊ लागली. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कर्जमाफीची घोषणा केली.
ठळक मुद्देदिलासा : १०९ गावातील शेतकऱ्यांना मिळाला लाभ