लोकमत न्यूज नेटवर्कमासळ (बु.) : गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याच्या निषेधार्थ कोलारा (तु ) जि. प. उच्च प्राथ शाळेला संतप्त गावकºयांनी शनिवारी कुलूप ठोकले. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.कोलारा (तु.) जि. प. शाळेत शिक्षक सारये हे कवायतीची तासिका घेत असताना प्रभारी मुख्याध्यापक गभने यांच्या चिथावणीने एका विद्यार्थ्याने कवसकुर्ली फेकून पळ काढला. ही घटना ३ जानेवारीला घडली. संबंधित कृत्य करणाºया विद्यार्थ्याने ही माहिती पालकाला सांगितली. दरम्यान, गावकºयांनी शाळेत जावून प्रभारी मुख्याध्यापक गभने यांच्याकडे माहिती मागितली. मात्र उडवाउडवीचे उत्तर दिल्याने गटशिक्षण अधिकारी पिसे यांच्याकडे निवेदन दिले होते. ते चौकशीसाठी आले असता ही घटना घडली.गट शिक्षणाधिकारी चौकशीकरीता आले. पण या प्रकरणात तथ्य नसल्याचे सांगुन ‘ही शाळा माझ्या मालकीची आहे’ असे वक्तव्य केले. दरम्यान, गावकºयांमध्ये संताप निर्माण झाला. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकण्यात आले.-रायभान शेरकुरे, अध्यक्ष शाळा, व्यवस्थापन समितीकोलारा जि. प. शाळेतील शिक्षक सारये यांच्या चिथावणीमुळेच ग्रामस्थांनी मुख्याध्यापक कक्षात वाद घातला. त्यामुळे गावकºयांनी ज्या प्रकरणाबाबत तक्रार केली होती. त्याची चौकशी होऊ शकली नाही.-किशोर पिसे, गट शिक्षणाधिकारी, चिमूर
गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:23 PM
गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याच्या निषेधार्थ कोलारा (तु ) जि. प. उच्च प्राथ शाळेला संतप्त गावकºयांनी शनिवारी कुलूप ठोकले. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देकोलारा (तु.) येथील घटना : वक्तव्याविरूद्ध पालक संतप्त