कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव होतात राज्य सरकारने लॉकडाऊन केले. जिल्ह्यातील सर्व सीमा बंद झाल्या. पोस्ट वगळता कोणतीही सार्वजनिक सेवा उपलब्ध नव्हती. हजारो नागरिकांचे हाल झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू झाले तर पोस्टाची सेवा अविरत सुरू होती. पोस्टमनपासून सारे उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी देशभरात सेवा पोहोचविण्यासाठी प्राणपणाने झटत होते. चंद्रपूर जिल्ह्यात या कालावधीत.... कोटींची रक्कम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे नागरिकांची आर्थिक कोंडी दूर होऊ शकली.
बॉक्स
औषधी वेळेवर पोहोचल्याने अनेकांना जीवनदान
कोरोना लॉकडाऊनमध्ये औषध पुरवठा करण्याला परवानगी दिली. मात्र, वाहतूकव्यवस्था बंद असल्याने दुर्धर रूग्णांपर्यंत औषधी पोहोचविण्याचा प्रश्न निर्माण झाला. जीवाचा पर्वा न करताना पोस्टमनने जिल्ह्यातील खासगी मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांचा पुरवठा केला. त्यामुळे जिल्ह्यात औषधांचा तुटवडा निर्माण झाला नाही. पेन्शन रक्कम, देशभरातील येणारी पत्रे, विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे पोस्टामुळेच शक्य झाले.
कोट
लॉकडाऊन हा अग्नीपरीक्षेचाच काळ होता. मात्र, केंद्र सरकारच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन नियोजन करण्यात आले. नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविताना पोस्टमनपासून सा-यांचीच काळजी घेण्यात आली. त्यामुळे या काळात पोस्टाने उत्तम सेवा दिली.
-बन्सोड, डाक उपअधीक्षक, चंद्रपूर