लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठा प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा दोन टप्प्यात लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्हिडिओ संदेशातून केली आहे. पहिला टप्प्यात ३ सप्टेंबरपासून सात दिवस मेडिकल स्टोअर्सवगळता संपूर्ण आस्थापने बंद राहील. सात दिवसानंतर दुसरा टप्प्यात पुन्हा लॉकडाऊन राहील. मात्र यात कोणती शिथिलता राहील, हे नंतर स्पष्ट करण्यात येणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २०७४ वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून ११७६ बाधित बरे झाले आहेत. तर सध्या ८७३ बाधितांवर उपचार सुरू आहे. शनिवारी नव्या १७८ बाधितांची नोंद झाली आहे.शनिवारी पुढे आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक ७६ बाधित ठरले आहेत. त्याचबरोबर पोंभुर्णा चार, कोरपना पाच, सिंदेवाही दोन, वरोरा आठ, ब्रह्मपुरी चार, राजुरा १०, मूल १६, गोंडपिपरी पाच, सावली ३३, भद्रावती चार, चिमूर दोन, बल्लारपूर आठ, नागभीड एक असे एकूण १७८ बाधित पुढे आले आहेत.चंद्रपूर शहरातील नगिना बाग, पंचशील चौक, जटपुरा वार्ड, जलनगर, भानापेठ, तुकूम, रामाळा तलाव, विठ्ठल मंदिर वार्ड, बियाणी नगर, चांदमारी चौक, पठाणपुरा गेट, गंज वार्ड, रामनगर, गोपाल पुरी वार्ड, सरकार नगर, रयतवारी, सिव्हील लाईन, जीएमसी चंद्रपूर परिसर, नर्सिंग होस्टेल परिसर, गायत्री नगर, बालाजी वार्ड, सन्मित्र नगर, कृष्णा नगर, अंचलेश्वर वॉर्ड, बाबुपेठ, समाधी वार्ड तर तालुक्यातील घुग्घुस, मोहर्ली गेट भागातून बाधित ठरले आहेत.पोंभुर्णा तालुक्यातील कसरगट्टा गावातून बाधित पुढे आले आहेत. कोरपना तालुक्यातील उपरवाही, गडचांदूर, आवारपूर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. सिंदेवाही शहरातील तसेच तालुक्यातील लोनवाही गावातून बाधित ठरले आहेत. वरोरा येथील गुरु माऊली नगर, अभ्यंकर वार्ड तर तालुक्यातील शेगाव, अहेगाव गावातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. ब्रह्मपुरी येथील गुरुदेव नगर तर तालुक्यातील नानोरी, चांदली गावातून बाधित ठरले आहेत.राजुरा येथील पेठ वार्ड, इंदिरानगर, साई मंदिर परिसरातील तर तालुक्यातील लखमापूर, विहीरगाव भागातून बाधित पुढे आले आहेत. मूल तालुक्यातील फिस्कुटी, चिंचाळा, बोरचांदली, राजोली गावातून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी, वढोली भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. सावली तालुक्यातील व्याहाड बु, सामदा गावातून बाधित पुढे आले आहेत. भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथून बाधित ठरले आहेत. चिमूर तालुक्यातील सोनेगाव व म्हसाळा गावातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.आणखी दोघांचा मृत्यू, तीन दिवसांपासून दररोज दोघांचा मृत्यूजिल्ह्यात शनिवारी दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. नेताजी चौक विंजासन रोड, भद्रावती येथील ७० वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधित महिलेला १९ आॅगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. कोरोनासह न्युमोनिया असल्याने २८ आॅगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच तिचा मृत्यू झाला. तर शनिवारी पहाटे २.३० वाजता शेडमाके चौक दुर्गापूर येथील ४९ वर्षीय बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. २९ जुलैला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून बाधिताला श्वसनाचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय शर्थीचे प्रयत्न करूनही शनिवारी पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाधिताचा मृत्यू झाला. या बाधिताला न्युमोनियाचा आजार होता. लागापोठ तिसऱ्या दिवशी दोघांचा मृ्त्यू झाला आहे.
३ सप्टेंबरपासून लॉकडाऊन कडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 5:00 AM
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २०७४ वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून ११७६ बाधित बरे झाले आहेत. तर सध्या ८७३ बाधितांवर उपचार सुरू आहे. शनिवारी नव्या १७८ बाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी पुढे आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक ७६ बाधित ठरले आहेत.
ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा उद्रेक सुरूच। नव्या १७८ सह २०७४ वर पोहचली रुग्णसंख्या