लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सन १९७६-७७ पासून निमढेला गावातील घरे व शेती चंदईनाला प्रकल्पात अधिग्रहित केल्यानंतरसुद्धा त्या गावातील शेतकरी व नागरिकांना केवळ पुनर्वसनाच्या नावाखाली तात्पुरती जलसंपदा विभागाच्या जागेवर राहण्यास जागा दिली. मात्र केवळ अल्पसा मोबदला देऊन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंबंधी दुसºया ठिकाणी शेती, पक्के घरे व कुटुंबातील एकाला प्रकल्पग्रस्त म्हणून शासकीय नोकरीत सामावून घेतले नाही. तब्बल ४० वर्षांनंतर चंदईनाला प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या दरवाजाला कुलूप ठोकून गुरुवारपासून साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.मागील ४० वर्षांपासून निमढेलावासीय आपल्या हक्कासाठी प्रशासनाशी निवदने, तक्रारी देऊन संघर्ष करीत आहे. परंतु त्यांना प्रशासनाने न्याय दिला नाही. पर्यायाने पहिल्या पिढीच्या संघर्षानंतर आता नव्याने दुसºया पिढीतील तरुणवर्ग शेवटचा पर्याय म्हणून चंदईनाला प्रकल्पाला ताले ठोकून साखळी उपोषणास बसले आहे.त्यांनी शासनाने अधिग्रहित केलेल्या शेतीच्या मोबदल्यात दुसºया ठिकाणी शेती द्या. निमढेलावासीयांना हक्काची जागा देऊन पुनर्वसन करा व शेतीचा जो मोबदला सरकारकडे बाकी आहे, तो आजच्या बाजारभावाने द्या आणि प्रकल्पग्रस्त म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या, आदी मागण्यांसाठी उपोषणाला सुरूवात केली आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन देणार नाही, तोपर्यंत प्रकल्पाचे पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका आहे.चंदईनाला प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी आश्वासन दिले, पण ते पाळले नाही. त्यांचा निषेध केला आहे व स्थानिक तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून चंदईनाला प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देऊ.- राजू कुकडे, मनसे
चंदईनाला प्रकल्पाला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:18 AM
सन १९७६-७७ पासून निमढेला गावातील घरे व शेती चंदईनाला प्रकल्पात अधिग्रहित केल्यानंतरसुद्धा त्या गावातील शेतकरी व नागरिकांना .....
ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांचा रोष : साखळी उपोषण सुरू