लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : 'देश का त्यौहार' असे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वर्णन करत 'गो कॉल टू १९५०' असे मतदारांना आवाहन करीत कन्याकुमारीहून कटरा शहरासाठी निघालेली हिमसागर एक्स्प्रेस शनिवारी रात्री साडेअकरा वाजता बल्लारपूर रेल्वेस्थानकावर पोहचली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार हे हिमसागर एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी उपस्थित होते.लोकसभा निवडणूक २०१९ च्या निमित्ताने देशभरातील १०० टक्के मतदारांनी मतदान करावे, मतदानाविषयी जनजागृती व्हावी, या हेतूने निवडणूक आयोग व भारतीय रेल्वेच्या सहकार्याने संपूर्ण देशभरात रेल्वे गाड्यांच्या माध्यामातून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. देशभरात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर मतदार जनजागृतीचे फलक लावून प्रभावी संदेश पोहचविण्याचे कार्य केल्या जात आहे. यावेळी उपस्थित प्रवाशांनी रेल्वे गाडीसोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी उपस्थित प्रवाशांसोबत संवाद साधला. लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे कसे महत्त्व आहे, यासंदर्भात माहिती दिली. तरूणांशी संवाद साधून मतदानात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. ११ वाजून ४० मिनिटांनी डॉ. खेमणार यांनी रेल्वेगाडीला हिरवा प्रकाश दाखवून पुढच्या प्रवासासाठी रवाना केले. ही एक्सप्रेस लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे.यावेळी मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक रामलाल सिंग, एमसीएमसी समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके व प्रवासी उपस्थित होते.
Lok Sabha Election 2019; हिमसागर एक्स्प्रेसने केली मतदार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:13 PM
'देश का त्यौहार' असे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वर्णन करत 'गो कॉल टू १९५०' असे मतदारांना आवाहन करीत कन्याकुमारीहून कटरा शहरासाठी निघालेली हिमसागर एक्स्प्रेस शनिवारी रात्री साडेअकरा वाजता बल्लारपूर रेल्वेस्थानकावर पोहचली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार हे हिमसागर एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
ठळक मुद्देअनेकांनी काढली सेल्फी : मतदार जनजागृतीचा ‘काश्मीर टु कन्याकुमारी’ प्रवास