शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

Lok Sabha Election 2019; अपक्ष उमेदवारांकरिता चॉकलेट, अंगठी, भेंडी अन् हिरव्या मिरच्याही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:34 AM

यंदा राष्ट्रीय पक्षांसाठी ७ चिन्हे राखीव आहेत तर अपक्षांना चॉकलेट, भेंडी, बांगडी, कानातले (ईअररिंग), बॉटल, टोपी, नेकलेस आदींचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देविविध वस्तूंचा चिन्हांसाठी वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणकीचे वातावरण आता तापू लागले आहे. २९ मार्चला उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणुक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यंदा राष्ट्रीय पक्षांसाठी ७ चिन्हे राखीव आहेत तर अपक्षांना उपलब्ध १९९ निवडणूक चिन्हांमधून एकाची निवड करावी लागणार आहे. या चिन्हांमध्ये चॉकलेट, भेंडी, बांगडी, कानातले (ईअररिंग), बॉटल, टोपी, नेकलेस आदींचा पर्याय उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाची २६ मार्च ही डेडलाईन आहे. २९ मार्चला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. याच दिवशी उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येईल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, सीपीआय, सीपीएम व बहुजन समाज पार्टी हे राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यामुळे या राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह राखीव आहेत. अन्य प्रादेशिक पक्षांनाही त्यांचे अधिकृत चिन्ह मिळणार आहे.अपक्ष उमेदवारांसाठी १९९ निवडणूक चिन्ह राखीव ठेवण्यात आली आहेत. यंदा ३६ चिन्हे हे नव्याने समाविष्ट झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.केंद्रीय निवडणूक आयोगाने २० जून २०१८ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार चिन्ह जाहीर करण्यात आले. या यादीमध्ये एअर कंडीशन, कपाट, आॅटो रिक्षा, बेबी वॉकर, बलून, फळांची टोपली, बॅट, बॅट्समन, बॅटरी, टार्च, मन्यांचा नेकलेस, बेल्ट, बेंच, सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप, दुर्बिंण, बिस्कीट, ब्लॅक बोर्ड, जहाज, बॉटल, बॉक्स, ब्रेड, विट, ब्रिफकेस, ब्रश, बकेट, कॅन, कारपेट, कॅरम बोर्ड, चेन, चक्की, चपाती रोलर, चेस बोर्ड, कोट, नारळाची बाग, कलर ट्रे तसेच ब्रश आदी चिन्हांचा समावेश आहे. उमेदवारांना या चिन्हांमधून एक निवड करण्याचा पर्याय देण्यात आला.नवीन ३६ चिन्हांचा समावेशआयोगाने नव्याने ३६ चिन्हांचा यामध्ये समावेश केला आहे. यामध्ये सफरचंद, हेलिकॉप्टर, शिडी वाजविणारा माणूस, ब्रेड टोस्टर, सीसीटीव्ही, कॉम्प्युटर, कॉम्प्युटर माऊस, डोअर बेल, कानातले, फूटबॉल, अद्रक, पर्स, कार्ट, ग्लॉस, केटली, सिंक, फूटबॉल प्लेयर, लॅपटॉप, लुडो, पेनड्राईव्ह, रिमोट, रबरस्टॅम्प, जहाज, सतार, शटर, सोफा, स्पॅनर, स्टॅप, स्विचबोर्ड, चिमटा, ट्युबलाईट आदी चिन्हांचा समावेश आहे.निवडणूक चिन्हात फुलकोबी, आईस्क्रीम अन् चप्पलपेट्रोल पंप, डिझेल पंप, डिश अँटेना, डोली, फ्रॉक, द्राक्षे, बांगड्या, मण्यांचा नेकलेस, शिशी, ब्रेड, फुलकोबी, चप्पल, चिंमणी, हिरवी मिरची, हेडफोन, फ्रॉक, द्राक्षे, हिरवी मिरची, हेटफोन, हॉकी आणि बॉल, आईसक्रिम, शेंगदाना, मोती, मटर, फोन चार्जर, रेझर, सेफ्टी पिन यासह विविध मजेदार चिन्हे यावेळी अपक्ष उमेवारांना मिळणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक