लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : मागील अनेक वर्षे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा वाद अजूनही कायम आहे. या गावांतील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. एकाच दिवशी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दोनदा मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे.११ एप्रिलला देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील १४ गावे चंद्रपूर जिल्ह्यात येतात. पण न्यायालयाच्या आदेशानंतरी महाराष्ट्र सरकारने हा तिढा सोडविला नाही. चंद्रपूर- आर्णी व तेलंगणातील आदिलाबाद या दोन्ही लोकसभा क्षेत्रासाठी मतदान करणार काय, हा प्रश्न विचारला जात आहे.दोन्ही लोकसभा क्षेत्राचे मतदान हे पहिल्या टप्प्यातच आहे. सीमेवरील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. दोन्ही राज्यांच्या सोयीसुविधा लाभ घेतात. दोन्ही ग्रामपंचायतला मतदान करतात. दोन्ही राज्याचे सरपंच निवडतात. एकाच दिवशी मतदान असल्यामुळे या भागातील मतदार डबल मतदान करणार काय, हा चर्चेचा विषय ठरला आहे.‘एक व्यक्ती एक मतदान’ असे असताना दोन्हीकडे मतदान करणे नियमांच्या विरुद्ध आहे. २००९ रोजी लोकसभा निवडणूक एकत्र झाली होती. त्यावेळी काही मतदारांनी दोन्हीकडे मतदान केले. पती एका राज्यात तर पत्नी दुसऱ्या राज्यात मतदानाचा हक बजावला होता, हेदेखील दिसून येते.दोन्हीकडे पहिल्या टप्प्यात मतदानमहाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावे दोन्ही राज्यात येतात. महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान कुठे करावे, हा प्रश्न चर्चेचा विषय झाला आहे.निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आव्हानमतदान केंद्रावर उपस्थित असणाºया अधिकाºयांची यावेळी कसोटी ठरणार आहे. बोठाच्या तर्जनीवर शाई लावली जाते. पण, दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत नाही असल्याने सत्यता तपासणे आव्हान ठरणार आहे. या गावांमध्ये दोन्ही राज्याच्या योजना कार्यान्वित आहेत.
Lok Sabha Election 2019; सीमावर्ती मतदारांच्या भूमिकेकडे राजकीय पक्षांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:16 PM
मागील अनेक वर्षे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा वाद अजूनही कायम आहे. या गावांतील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. एकाच दिवशी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दोनदा मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठळक मुद्देवाद कायम : १४ गावांतील मतदार दोन्ही राज्यांचे रहिवासी