शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Lok Sabha Election 2019; चंद्रपूरच्या खासदारासाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:26 AM

मागील १५ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आता संपली आहे. या १५ दिवसात रिंगणात असलेल्या १३ उमेदवारांनी आपले विचार, आपली मते मतदारांसमोर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज मतदारांचा दिवस उजाडला आहे.

ठळक मुद्दे२,१९३ मतदानयंत्रांची व्यवस्था : लोकसभा मतदारसंघात ५२ मतदान केंद्रे क्रिटीकल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील १५ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आता संपली आहे. या १५ दिवसात रिंगणात असलेल्या १३ उमेदवारांनी आपले विचार, आपली मते मतदारांसमोर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज मतदारांचा दिवस उजाडला आहे. १९ लाख ४ हजार ३२ मतदार मतदानाचा हक्क बजावून उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत. यासाठी २ हजार १९३ मतदार केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यात ५२ क्रिटीकल मतदान केंद्र आहे. याशिवाय महिलांसाठी विशेष सोय म्हणून यंदा प्रथमच विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी दोन सखी मतदान केंद्रही उभारण्यात आले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी ईव्हीएम मशीनसह आपापल्या केंद्रावर जाण्यासाठी रवाना झाले आहे. क्रिटीकल मतदान केंद्रांसह अन्य केंद्रावरही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक गावात, शहरातही सर्व घडामोडींवर पोलीस दल लक्ष ठेवून असणार आहे.मतदारांसाठी २८७२ व्हीव्हीपॅटलोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच दोन हजार ८७२ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.१९ लाख चार हजार ३२ मतदार१३-चंद्र्रपूर लोकसभा संघ निवडणुकीसाठी १५ हजार कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले. मतदार संघात १९ लाख ४ हजार ३२ सर्वसाधारण मतदार आहेत. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ९ लाख ८४ हजार ३८१, महिला मतदारांची संख्या ९ लाख १९ हजार ६२८ व तृतीयपंथी २० आहेत. दिव्यांग मतदार ६ हजार २६९ यामध्ये अंध मतदारांची संख्या ८९६ आहे. ५२ संवेदनशील मतदान केंद्रात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान करण्यासाठी २ हजार २९३ मतदान केंद्रे आहेत. केंद्र्रनिहाय इव्हीएम मशीन बसविण्यात येणार आहे.२१० केंद्रातून होणार लाईव्ह कास्टचंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील एकूण मतदान केंद्रापैकी २१० केंद्रातील मतदान प्रक्रिया थेट लाईव्ह बेव कास्ट करण्यात येणार आहे. या केंद्रातील हालचालींवर निवडणूक आयोग थेट लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे, सदर लाईव्ह कॉस्ट केवळ निवडणूक विभागच बघू शकणार आहे.मतदानासाठी यापैकी एक ओळखपत्र जवळ बाळगा१) पासपोर्ट, २) वाहन चालविण्याचा परवाना, ३) केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतील छायाचित्रसहीत ओळखपत्र, ४) बँकेने दिलेले खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, ५) आयकर विभागाकडील ओळखपत्र (पॅन कार्ड) मालमत्तेबाबतची कागदपत्रे (फोटोसहित), ६) एनपीआरमधे आरजीआयचे स्मार्ट कार्ड, ८) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, ९) केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित ओळखपत्र, १०) सेवानिवृत्तीचे फोटोसहीत दस्तऐवज, ११) लोकसभा सदस्य विधान मंडळ सदस्य यांना दिलेले ओळखपत्र,आधार ओळखपत्र, १२) मतदार ओळखपत्राचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019