शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Lok Sabha Election 2019; दारूबंदीसाठी प्राणांतिक लढा दिला म्हणून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 8:52 PM

भाजप असो की काँग्रेस या प्रश्नासाठी २००१ पासून मी जाहीर विरोधी भूमिका घेत असून यावर मी ठाम आहे. कुणी कोणताही अपप्रचार करोत मला पर्वा नाही, असा दावा श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला.

ठळक मुद्देपारोमिता गोस्वामी‘लोकमत’शी खास बातचित

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी झाली. मात्र राज्य सरकारने अद्याप कायदा केला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०१९ च्या अधिवेशनात कडक कायदा करू, असे लेखी आश्वासन मला दिले आहे. हे आश्वासन पाळले नाही तर भाजपविरुद्धही उपोषणाचे हत्यार उपसणार आहे. दारूबंदीसाठी मी प्राणांतिक लढा दिला. परिणामी, भाजपच्या काळातच बंदी झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दारूविक्रेत्या उमेदवारालाच उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप असो की काँग्रेस या प्रश्नासाठी २००१ पासून मी जाहीर विरोधी भूमिका घेत असून यावर मी ठाम आहे. कुणी कोणताही अपप्रचार करोत मला पर्वा नाही, असा दावा श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला. लोकसभा निवडणूक प्रचाराचा आखाडा रंगत असताना अ‍ॅड. गोस्वामी यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला उघड विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.

काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध करून आपण थेट भाजपला पाठींबा देत आहात?हा आरोप खोटा आहे. यासाठी मी थोडे मागे जाते. जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, याकरिता २००१ पासून श्रमिक एल्गार सातत्याने लढा देत आहे. यावर्षी मूल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे दारूबंदी झालीच पाहिजे, यासाठी मिळेल त्या पक्षांचा पाठींबा घेऊन व्यापक लढ्याची पार्श्वभूमी तयार केली. शेकडो मोर्चे काढले. त्यामुळे माझ्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. जीवघेण्या धमक्यांना सामोरे जावे लागले. हा सर्व प्रकार काँग्रेसच्या कालखंडातच झाला. दरम्यान, भाजप सरकारने सकारात्मक पाऊल उचलले. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात दारूबंदी झाली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या अन्यायकारक धोरणांविरूद्ध मी आंदोलने करीत आहे. जनतेवर अन्याय झाल्यास मी गप्प बसणार नाही. काँग्रेस पक्षाची विचारधारा व दारूबंदीसंदर्भात त्या पक्षाची भूमिका जाहीर असताना दारू विक्री करणाऱ्या नेत्याला लोकसभेची उमेदवारी का देण्यात आली, हा माझा प्रश्न आहे. मी स्वत: चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतदार आहे. मतदार म्हणून अशा उमेदवारांना कोणत्या नैतिकच्या आधारावर समर्थन द्यायचे? त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून हा प्रश्न उघडपणे का मांडू नये. दारूबंदीविरूद्धचा माझा हा विरोध निवडणुकीपुरता नाही. सरकार कुणाचीही येवो. चंद्रपूर मतदार संघात दारूबंदीला समर्थन करणाऱ्यांचा जाहीर विरोध करत राहू. .

भाजपने ऐन निवडणुकीच्या तोेंडावर मद्य उत्पादकाला लोकसभेची उमेदवारी दिली.- अहमदनगर जिल्ह्यातील सुजय विखे पाटील हे भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. त्या जिल्ह्यातील महिलांनी दारूबंदीसाठी मला बोलाविले तर तिथे जाऊन भाजपच्या विखे पाटलाविरोधात प्रचार करायला आजही तयार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मी मतदार आहे. त्यामुळे या क्षेत्रापुरताच मी हा निर्णय घेतला आहे. वर्धा, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातही श्रमिक एल्गारचे संघटन आहे. तेथील कार्यकर्ते आपल्या विवेकानुसार निर्णय घेतील.

दारूबंदीचा कायदा करण्यास भाजप सरकार का घाबरते ?- राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. मात्र गुन्हेगारांना शिक्षा मिळावी, या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा करता यावी, याकरिता सरकार कायदा करण्यास घाबरत आहे. भाजप सरकार यात अपयशी ठरले. या मुद्यावरून राज्यातील भाजप सरकारविरूद्ध अनेक सभा बैठकांमधून मी विरोध करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०१९ च्या अधिवेशनात दारूबंदीचा कडक कायदा करू, असे लेखी आश्वासन मला दिले. सरकारने हे आश्वासन पाळले नाही तर आंदोलन करण्यापासून मला कुणीही अडवणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार धानोरकर यांना विरोध करण्यामागे माझा व्यक्तिगत कुठलाही हेतू नाही. दारूबंदीसाठी आम्ही शेकडो लढे उभारले. त्यामुळे दारूविक्री करणाºया काँग्रेसच्या उमेदवाराचे आम्ही कदापि समर्थन करणार नाही.

भाजप सरकारने वनहक्क कायद्यातील त्रुटींकडे दुर्लक्ष केले?यासाठीच मी मागील चार वर्षांत शेकडो आंदोलने व मोर्चे काढले. खरे तर कायदा काँग्रेसने तयार केला. गैरआदिवासींसाठी तीन पिढ्यांची अट लावून देशातील लाखो वननिवासी जनतेवर अन्याय करण्यात आला आहे. केंद्रात भाजपचे बहुमताचे सरकार असूनही कायद्यातील त्रुटी दूर झाल्या नाहीत. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्याच्या प्रक्रियेत राज्य पातळीवरील बैठकीत मला बोलाविले होते. त्या बैठकीत मी अनेक सुचना केल्या. आदिवासींसोबतच देशातील लाखो वननिवासी गैरआदिवासींच्या हितासाठी वन कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा विषय निवडणूक जाहीरनाम्यात मी प्रामुख्याने मांडला होता. मात्र, हा विषय जाहीरनाम्यात आला नाही असो... काँग्रेसमध्ये अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत.

राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या, या शब्दात विरोधक तुमच्यावर टीका करतातहे खरे आहे. लोकशाही व्यवस्थेत राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवणे काही गैर नाही. मतदार आणि उमेदवार म्हणून निवडणुकांना सामोरे जाण्यात गैर काय आहे? लोकशाहीवर माझा विश्वास आहे. या मार्गानेच अनेक लढे देऊन वंचित समाज घटकांना न्याय मिळवून दिला. केवळ आंदोलन नाही तर विधायक कृतिशील उपक्रमांवरही माझा भर आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019