या शिबिराचे उद्घाटन नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या हस्ते होईल. नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे हे अध्यक्षस्थानी राहतील. पं. स. चे सभापती प्रफुल्ल खापर्डे, उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर, कृऊबासचे सभापती अवेश पठाण, नागभीडचे ठाणेदार प्रमोद मडामे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी गावंडे, जि. प. सदस्य संजय गजपुरे, नागभीड व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्माणी, न. प. चे बांधकाम सभापती सचिन आकूलवार, तालुका भाजपचे अध्यक्ष संतोष रडके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, नगरसेवक दिनेश गावंडे, प्रतीक भसीन, राष्ट्रवादीचे मंगेश सोनकुसरे, प्रहारचे वृषभ खापर्डे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बॉक्स
यांचा असणार सहभाग
या शिबिरास व्यापारी संघ नागभीड, नागभीड तालुका केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटना, नागभीड मित्रमंडळ, आपुलकी फाउंडेशन, खैरे कुणबी समाज संघटना,लोकमत सखी मंच, झेप निसर्ग संस्था, आशा वर्कर संघटना, म. रा. जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्यासह विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्ष यांचे सहकार्य लाभणार आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी घनश्याम नवघडे, सखी मंच संयोजिका रजनी घुटके प्रयत्नरत आहेत.
बॉक्स
तळोधी येथेही शिबिर
१२ जुलैला तळोधी (बा.) येथेही ‘लोकमत’कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करून ''लोकमत रक्ताचं नातं'' या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.