सिंदेवाही : शहरातील सर्वांगिन विकासाच्या दृष्टिकोनातून तालुक्याचे ठिकाण आहे. शहराला लागूनच असलेल्या लोन वाही गावातील स्मशानभूमी दुर्लक्षित आहे . मरणानंतर च गेलेले बरे ! असे जिवंत माणसाचे तोंडून वाक्य बाहेर येत आहे. स्मशानभूमी जीर्णावस्थेत तुटके- फुटके टिन शेड उभे आहे . झाडाांचा झुडपांचा विळखा वाढलेला आहे. मानवास जन्मानंतर एक ना एक दिवस स्मशानभूमीत मरणानंतर जावेच लागते हे सत्य नाकारता येत नाही .. स्मशानभूमी वॉर्ड क्रमांक 3 मधील गावाचे बाहेरील 1 किलो मीटर चे अंतर खडतर रस्त्यांनी नाल्याचे काठावर आहे. चंद्रपूर जिल्हा परिषेच्या जनसुविधा कार्यक्रम 16 - 17 चे अंतर्गत 10 लक्ष रुपये निधी खर्च करून बांधकाम करण्यात आले आहे. लोन वाही परिसरातील काही नागरिकांना आपल्या गावाला स्मशानभूमी असल्याची माहितीच नाही. झाडेझुडपे वाढलेले, विद्युत पुरवठा, पिण्याचे पाणी, स्मशानभूमी ला टिनाचे शेड तुटके पुटके अवस्थेत , लाईटची व्यवस्था नसल्याने रात्रीचे वेळी अंत्यसंस्कार करणे कठीण जात आहे. स्मशानभूमीत सोई सुविधा उपलब्ध नसल्यामुळे फक्त मृतकावर अंत्यसंस्कारांसाठी जावे लागते त्यामुळे की काय ! असा समज नागरीकांचा असून मरणा नंतरचं गेलेले बरे ! दुर्लक्षित स्मशानभूमीकडे ग्राम पंचायत लोन वाही चे लक्ष जाताना दिसत नाही. याविषयी जनसामान्यात नागरिक आश्चर्य व्यक्त केले जात आहे .
लोनवाहीची स्मशानभूमी दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:25 AM