शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

अत्याधुनिक उपकरणांद्वारे मिरवणुकीवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 11:46 PM

मंगळवारी चंद्रपूर शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरुन निघणार आहे. मिरवणूक पाहण्याकरिता शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

ठळक मुद्देतगडा बंदोबस्त : वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मंगळवारी चंद्रपूर शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरुन निघणार आहे. मिरवणूक पाहण्याकरिता शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या ठिकाणी गणेश भक्तांना कोणताही त्रास होवू नये तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून विसर्जन मिरवणूक शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पाडण्याकरिता पोलीस प्रशासन अत्याधुनिक उपकराणांद्वारे निगरानी ठेवणार आहे.पोलीस अधीक्षक नियती ठाकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत याच्या मार्गदर्शनात अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने बंदोबस्ताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये शहरात एकूण १०६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून संपूर्ण सिस्टम अद्यावत करण्यात आली आहे. प्रत्येक चौकात आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही व ४० हॅन्डी कॅमेराद्वारे संपूर्ण मिरवणूक बंदोबस्तावर बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासोबतच ११ हायटेक कॅमेºयाचे सुसज्ज असलेली लाईव्ह मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनद्वारे आणि मिरवणूक मार्गावर, महत्वाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे अतिसुक्ष्म निगराणी ठेवण्यात येणार आहे.संपूर्ण बंदोबस्ताकरिता एक अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, ६१ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्ष, ८०० पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथके, नक्षल विरोधी अभियान पथके, अति जलद प्रतिसाद पथके व २०० गृहरक्षक नेमण्यात आले असून त्यांच्यासोबतच २०० पोलीस मित्रांसह विविध एनजीओचे स्वयंसेवक सहभाग घेणार आहेत.मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याकरिता ध्वनी प्रदूषण प्रतिबंध पथके आवश्यक यंत्रणेसह नेमण्यात आलेले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.अशी असणार चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थाच्बंगाली कॅम्प ते सावरकर चौक, एसटी स्टँड- प्रियदर्शनी चौक ते कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक तसेच पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट मार्गे प्रियदर्शनी चौक ते जुना वरोरा नाका हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येईल.नागपूर मार्गाने येवून बल्लारपूर किंवा मूलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने प्रियदर्शनी चौककडे जाण्यास बंदी असल्याने सर्व प्रकारची वाहने ही जुना वरोरा नाका- बेलेवाडी जुना उड्डान पुल- सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मूल किंवा बल्लारपीर जातील.मूल किंवा बल्लारपूरकडून नागपूरकडे जाणारी सर्व वाहने बंगाली कॅम्प- सावरकर चौक नवीन उड्डाणपुल मार्गे नागपूरकडे जातील.नागपूरकडून शहरामध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळून) घुटकाळा, श्री टॉकीज, पठाणपुरा परिसरात जायचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगर-संत केवलराम चौक-सेंट मायकल स्कूल-सवारी बंगला चौक- नगीनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील.चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील रहीवाशांनी नागपूर, वणी, घुग्घुस, गडचांदूरकडे जाणाºया प्रवाशांनी रहेमत नगर, नगीनाबाग व इतर परिसरात जाण्यासाठी बिनबा गेट रहेमत नगर, दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा.बल्लारशाह व मूलकडून येणाºया सर्व वाहनांना (जड वाहने वगळून) शहरामध्ये जायचे असल्यास बसस्टँड एलआयसी आॅफीस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पंम्पकडून बाबुपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल.हे आहेत ‘नो पार्किंग झोन’ स्थळजटपुरा गेट ते कस्तुरबा चौक पर्यंत, जटपुरा गेट ते रामाळा तलाव पर्यंत, जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक पर्यंत, जटपुरा गेट ते दवा बाजार चौक पर्यंत, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट पर्यंत, गांधी चौक ते मिलन चौक ते जोडदेऊळ पर्यंत, कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक, दस्तगीर चौक ते मिलन चौक, मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्नीक कॉलेज, हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स, मौलाना आझाद चौक ते जयंत टाकीज, छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिर पर्यत नो पार्किंग झोन असेल.आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईगणेश उत्सव अंतीम टप्प्यात आहे. गणेश विसर्जन शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. अशातच काही गुंडप्रवृत्तीच्या इसमांकडून गणेश उत्सव विसर्जन मिरवणूकी दरम्यान काही अनुचित प्रकार घडवून शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये, याकरीता जिल्ह्यातील गुंडप्रवृत्तीच्या आणि गुन्हेगारी रेकार्ड असलेल्या इसमांवर फौजदारी प्रक्रिया संहीता कलम १४४ (२) अन्वये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून मनाई आदेश काढण्यात आले आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये आणि परिसरात फिरण्यास प्रतीबंध घातले आहे.